शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

छंद बुद्धमूर्ती संग्रहाचा !

By admin | Updated: May 21, 2016 00:47 IST

छंद ही व्यक्तिगत नैसर्गिक आवड, अभिरुचीची बाब. छंदातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विचारधारणा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो

पुणे : छंद ही व्यक्तिगत नैसर्गिक आवड, अभिरुचीची बाब. छंदातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विचारधारणा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. आंतरिक ऊर्मीतून आयुष्याची लय साधत जोपासलेला गौतम बुद्धांच्या मूर्तींच्या संग्रहाचा छंद आयुष्यातलं खरंखुरं समाधान मिळवून देणारा आहे, असे मत गौतमबुद्धांच्या मूर्तीचे संग्राहक दिलीप वानखेडे यांनी गौतम बुद्धांच्या २५६०व्या जयंतीनिमित्ताने व्यक्त केले. एक इंचापासून सहा फुटांपर्यंतच्या गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रांतील मूर्ती, चार हजारांहून अधिक पुस्तके, कॅलेंडरमधील फोटो, कात्रणे, बुद्धांची प्राचीन चित्रे, टपाल तिकिटे असा अमूल्य ठेवा गौतम बुद्धांच्या तत्त्वांची, त्यांनी दिलेल्या शांतीच्या संदेशाची आठवण करून देतो. दिलीप वानखेडे यांचा हा अनोखा संग्रह थक्क करायला लावणारा आहे. मालधक्का येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात हा अनोखा ठेवा आहे.३० वर्षांपूर्वीपासूनच वानखेडे यांना मूर्तींचा संग्रह करण्याचा छंद जडला. दिवसेंदिवस हा छंद अधिकच गहिरा होत गेला. १०८ रूपांतील भावमुद्रा बुद्धांच्या मूर्तींतून व्यक्त होतात. सध्या वानखेडे यांच्याकडे १ इंच ते ६ फुटांच्या सुमारे १२०० मूर्ती आणि ३-४ हजार पुस्तके आहेत.

>विविध देशांतून आणल्या मूर्ती

 

या संग्रहालयात बुद्धांच्या विविध मूर्ती पाहायला मिळतात. तैवानला गौतम बुद्धांच्या सुमारे २८,००० मूर्तींचे जगातील पहिल्या क्रमांकाचे संग्रहालय आहे. त्यानंतर आंबेडकर सांस्कृतिक भवनातील संग्रहालय हे बहुधा भारतातील सर्वांत मोठे संग्रहालय असावे. या संग्रहालयात थायलंड, जपान, कंबोडिया आदी देशांमधून आणलेल्या धातूच्या, दगडी तसेच लाकडी मूर्तींचा समावेश आहे. बुद्धांच्या मूर्तीबरोबरच सध्या दिलीप वानखेडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो संग्रहित करण्याचा छंद जडला आहे. १९९०मध्ये आंबेडकरांची प्रतिमा असलेले १ रुपयाचे नाणे चलनात आले होते. अशी १५ हजार नाणी वानखेडे यांच्याकडे आहेत. या संग्रहाची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. वानखेडे यांच्या संग्रहालयाला पीएचडी, तसेच यूपीएससी, एमपीएससीचे विद्यार्थी आवर्जून भेट देतात. अभ्यासासाठी त्यांना येथील पुस्तकांचा खूप उपयोग होतो. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही हे विद्यार्थी आठवणीने दिलीप वानखेडे यांना भेटायला येतात.