शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना संपाचा फटका

By admin | Updated: August 27, 2014 00:56 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका रुग्णांच्या जिव्हारी बसत आहे. आज मंगळवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसातील रुग्णांची

दोन दिवसातील मृत्यूसंख्या १६ वर : मेयोतील डॉक्टरही संपातनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका रुग्णांच्या जिव्हारी बसत आहे. आज मंगळवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसातील रुग्णांची मृत्यूसंख्या १६ वर पोहचली आहे. याशिवाय बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणारी रुग्णसंख्याही रोडावली आहे. आज सायंकाळी ‘मार्ड’चे पदाधिकारी व प्रशासनाची बैठक झाली. परंतु, तोडगा न निघाल्याने डॉक्टरांचा संप कायम होता. या संपात मंगळवार रात्रीपासून मेयोचे तर बुधवारपासून यवतमाळ मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर संपात सहभागी होणार आहे. यामुळे संप चिघळण्याची स्थिती आहे.रविवारी रात्री, रुग्ण गंभीर असताना ईसीजी काढण्यास टाळाटाळ केल्यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी हुज्जत घालून डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांनी एकमेकांविरोधात तक्रार केल्याने पोलिसांनी रुग्णाचे नातेवाईक व पाच डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. डॉक्टरला मारहाण झाल्याचा ‘इश्यू’ बनवत डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने रविवारच्या मध्यरात्री २ वाजतापासून संप पुकारला. परिणामी, सोमवारी व मंगळवारी रुग्णांचे अक्षरश: हाल झाले. संप मागे घेण्यासाठी प्रशासनासोबत सोमवारी तीनदा बैठकी झाल्या. पण, तोडगा निघाला नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली, तर अनेक शस्त्रक्रि या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आजही मेडिकल प्रशासन व मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत मेडिकल प्रशासनाने स्वस्तरावरील मागण्या मंजूर करून संप मागे घेण्याची विनंती केली. पण, डॉक्टर मानायलाच तयार नसल्याने रात्री उशिरापर्यंत संप कायम होता. मेडिकलमधील जवळपास ३०० च्यावर डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांच्या मृत्यूसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, उपचारार्थ भरती रुग्णांचा रक्तदाब चांगलाच वाढला आहे. (प्रतिनिधी)...तर डॉक्टरांवर कारवाई!या घटनेनंतर डॉक्टर व नातेवाईकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. घटनेला नातेवाईकांसह डॉक्टरही तेवढेच जबाबदार असल्याने प्रकरण वाढण्याची चिन्हे आहेत. कारण, डॉक्टरांनी एका निवृत्त सैनिकाला चोप दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवृत्त सैनिक न्यायालयात गेल्यास प्रकरणाला गंभीर वळण मिळू शकते. आज रात्रीपर्यंत डॉक्टरांनी संप मागे घेऊन उद्यापर्यंत कामावर न परतल्यास डॉक्टरांवर वसतिगृहातील खोली रिकामी करण्यासह इतर कारवाईची कुऱ्हाड कोसळू शकते, अशी शक्यता मेडिकलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही संप मागे न घेतल्यास कारवाई करण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे.ईसीजी कक्ष अपघात विभागात जाणारसंपाला कारणीभूत ठरलेले ‘ईसीजी’च आता अपघात विभागात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, अपघात विभागातच ईसीजीपासून, एक्स-रे व सोनोग्राफीची सोय असणे आवश्यक आहे. परंतु विविध कारणांमुळे या सोयी अपघात विभागापासून बऱ्याच लांब अंतरावर आहे. यामुळे आजाराचे निदान होऊन तत्काळ उपचार करण्यास उशीर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.