शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता गुन्हे तपासात उदासीनता

By admin | Updated: January 20, 2017 00:29 IST

आचारसंहितेचा केवळ बोलबालाच केला जात असून, गुन्हे दाखल करणे म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पुणे : निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहितेचा केवळ बोलबालाच केला जात असून, गुन्हे दाखल करणे म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या महापालिका निवडणुकी वेळी दाखल झालेल्या आचारसंहिताभंगाच्या गुन्ह्यांमध्ये केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली असून, तब्बल ४४ गुन्ह्यांमध्ये दोषींची निर्दोष सुटका झालेली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांकडे पोलिसांकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. आचारसंहिताभंगाच्या गुन्ह्यांचा केवळ देखावा उभा केला जात असल्याचे समोर आले आहे.मागील महापालिका निवडणुकी वेळी आचारसंहिताभंगाचे तब्बल १८१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास केला असून, त्यातील तब्बल १२६ गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. तर, ८ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली असून ४४ गुन्ह्यांमध्ये दोषींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. सध्या एक गुन्हा तपासावर प्रलंबित आहे. पत्रकार परिषदेमध्ये स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही माहिती दिली असून, एकूणच राजकीय गुन्ह्यांच्या तपासाबाबत पोलीस बोटचेपी भूमिका घेत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. याला राजकीय दबाव, उदासीन वृत्ती आणि सक्षम तपास न करणे, अशा अनेक बाबी कारणीभूत आहेत. लोकसभा असो, विधानसभा असो की जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका असोत निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू केली जाते. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, त्यांच्यावर पुढे काय कारवाई केली जाते, हे न सुटलेले कोडे आहे. अशा प्रकारचे गुन्हे केवळ सोपस्कार म्हणून दाखल केले जातात की काय, अशी स्थिती आहे. निवडणुका अधिक पारदर्शी आणि परिणामकारक होण्यासाठी आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक केले जाते. लोकप्रतिनिधी निवडून पाठवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये गुन्हे दाखल होण्याऱ्यांमध्ये राजकीय पुढारी किंवा कार्यकर्त्यांचा समावेश असतो. मात्र, ‘तडजोडी’मध्ये माहीर असलेले अनेकजण इथेही तडजोडीचे कौशल्य वापरतात. अदखलपात्र स्वरूपाच्या या गुन्ह्यांकडे पोलिसांकडूनही गांभीर्याने पाहिले जात नाही. तसेच, हे गुन्हे जामीनपात्र असल्याने त्याचा प्रभावही राहत नाही. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये ठोस आणि जरब बसवणारी कारवाई होत नसल्यामुळे सर्व काही ‘आलबेल’ चाललेले असते. आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी नागरिक, पुढारी, कार्यकर्त्यांकडून असते. मात्र, ‘एवढं तर चालणारच’ ही वृत्ती कायद्याच्या कठोर अंमलबजावणीच्या आड येते.>मर्यादित अधिकारनिवडणुकांच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्याव्यतिरिक्त पोलिसांना फारच मर्यादित अधिकार असतात. पोलिसांवरचा राजकीय दबाव, अपुरे मनुष्यबळ, निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी यांमुळे किरकोळ आचारसंहिताभंगाकडे दुर्लक्ष केले जाते.पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकांच्या निवडणुकांमध्ये १८१ गुन्हे दाखल झाले होते. २०१२मध्ये खडकवासला मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ५ गुन्हे दाखल झाले, तर २०१३मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पोटनिवडणुकीत ७ गुन्हे दाखल झाले होते.