शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे - अशोक चव्हाण

By admin | Updated: July 4, 2016 04:18 IST

राज्यातील भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे आहे.

औरंगाबाद : राज्यातील भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे आहे. हवामान खाते जसे सांगते एक आणि घडते दुसरेच. तशीच या सरकारची परिस्थिती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे युती सरकारची खिल्ली उडविली. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खा. चव्हाण येथे आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हवामान खाते जे सांगते ते घडत नाही. तसेच या सरकारच्याही निव्वळ घोषणा आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच नाही. युती सरकार म्हणजे (इज इक्वल टू) इंडियन मेटरॉलॉजिकल डिपार्टमेंट, असा उल्लेख त्यांनी केला. मराठवाड्यासह राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. एकही नवीन उपक्रम नसलेले हे सरकार आहे. जुन्या योजनांना नवीन नावे देण्याचा एकमेव कार्यक्रम हे सरकार राबवत आहे, अशी टीका त्यांनी केली. प्रशासकीय कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमी पडत असल्याचे खा. चव्हाण म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा प्रभाव कमी झाला का, या प्रश्नाला त्यांनी खुबीने टाळले. विरोधी पक्षनेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील उत्तम काम करीत असल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. खडसेप्रकरणी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी) शिक्षकमतदारसंघाचा विचार मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी आपल्याकडे अर्ज आले आहेत. तेथे उमेदवार देण्याबाबत विचार होत आहे. महिनाअखेरपर्यंत त्यावर निर्णय करू. पदवीधर मतदारसंघासाठीसुद्धा काँग्रेसचा विचार चालू आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.