शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव

By admin | Updated: September 15, 2016 04:08 IST

राज्यभरात होणाऱ्या मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यभरात होणाऱ्या मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला़ बुधवारी येथे आयोजित बैठकीत विखे बोलत होते़ ठिकठिकाणचे मोर्चे ही मराठा समाजातील सर्वसामान्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. मुख्यमंत्र्यांनी या मोर्चात सहभागी संघटनांशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरलेल्या संघटनांना बाजूला ठेवून केवळ भाजप नेत्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्न केला आहे, असेही विखे या वेळी म्हणाले. तसेच २३ सप्टेंबर रोजी नगर येथील मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.मराठा समाजाच्या आंदोलनांमुळे हादरलेल्या काही मंडळींनी दलित समाजाला चिथावणी देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या यासंदर्भातील विधानाशी सहमत असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आंदोलनाला जातीय रंग देऊन त्याविरोधात दलित समाजाचे प्रतिमोर्चे काढण्याचे कारस्थान रचले जात आहे. मराठा समाजाच्या मोर्चांबाबत गैरसमज निर्माण करून दलित समाजाला फूस देण्याचे उद्योगही काहींनी सुरू केले आहेत, असेही त्यांनी म्हटले. (प्रतिनिधी)