शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून कपडा बाजार बंद ?

By admin | Updated: October 16, 2016 03:16 IST

दिवाळी तोंडावर असतांना मुंबईच्या कापड बाजारातली उलाढाल मात्र थंडावणार आहे. गुमास्ता कामगारांच्या मागण्यांबाबत मालकांच्या संयुक्त कृती समितीसोबत सकारात्मक

मुंबई : दिवाळी तोंडावर असतांना मुंबईच्या कापड बाजारातली उलाढाल मात्र थंडावणार आहे. गुमास्ता कामगारांच्या मागण्यांबाबत मालकांच्या संयुक्त कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा न झाल्याने मुंबई गुमास्ता युनियनने सोमवारपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे.सणासुदीच्या दिवसात कापड बाजारात काम करणाऱ्या गुमास्ता कामगारांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी शुक्रवारसह शनिवारी बंद पुकारला होता. जर या दोन दिवसांत मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर बेमुदत संपाचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला होता. त्यानुसार संयुक्त कृती समितीने कामगारांच्या कामगारांच्या मागण्यांबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून कामगारांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या कामगारांना पगारवाढीसोबतच आरोग्य वीमा कवचही मिळायला हवे ही मागणी गुमास्ता कामगार संघटनेने केली आहे. दरम्यान, गतवर्षी याच मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता. तेव्हा त्यांना पंधरा हजार एकरकमी लाभवेतन देण्यात आले होते. मात्र यंदा कोणताही निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही.मंगलदास मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, जुनी हनुमान गल्ली या कापड बाजारातील वीस ते पंचवीस हजार गुमास्ता कामगार या संपात सहभागी झाले आहे. सकाळी दुकान उघडण्यापासून ग्राहकांना मनपसंत कपडे दाखवणे, विस्कटलेल्या कपड्यांची घडी घालणे, नेहमीच्या गाहकांकडून पैशांची वसुली करणे, अशी विविध कामे गुमास्ता करतात. परिणामी गुमास्ता कामगारांनी बेमुदत संपाची हाक दिल्यामुळे ही सर्व कामे एकटया मालकाला करणे शक्य नाही. त्यामुळे संपानंतर आपोआपच बाजार बंद पडण्याची शक्यता आहे.शर्टपीस, पँटपीस, साडया आणि कपड्यांचे विविध प्रकार याठिकाणी स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे मुंबईसह बाहेरील शहरांतील नागरिकही याठिकाणी खरेदीसाठी येतात. दिवाळीमध्ये येथे कोटयवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र गुमास्ता कामगारांच्या संपामुळे दिवाळीच्या तोंडावर पूर्ण बाजारपेठ ठप्प पडणार असून शासनाचा कोटयवधींचा महसूलही बुडणार आहे.