शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत कॉल एक्स्चेंज चालविणाऱ्यांना कोठडी

By admin | Updated: July 12, 2017 04:54 IST

अनधिकृत आंतरराष्ट्रीय कॉल एक्स्चेंज चालवणाऱ्या सहा जणांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : अनधिकृत आंतरराष्ट्रीय कॉल एक्स्चेंज चालवणाऱ्या सहा जणांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या सर्वांची आधारवाडी तुरुंगात रवानगी झाली असून युनूस इम्तियाज अहमद आझमी याला चौकशीसाठी लातूरला नेण्यात आले आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या कॉल एक्स्चेंजमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी चीनमधून मागवलेल्या यंत्रात बसवलेल्या सिमकार्डद्वारे राऊट करून भारतातील मोबाइल नंबर किंवा लॅण्डलाइनला जोडले जात होते. त्यामुळे भारतातील मोबाइलवर परदेशातील नंबर न येता भारतातील कंपनीचे नंबर येत होते. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेला अथवा डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनला ही माहिती मिळत नव्हती.या कॉलचे बिल डॉलरमध्ये मिळत असल्याने ते शहरातील वेस्टर्न युनियन सेंटरमधून कॅश केले जात होते. हा सर्व व्यवहार कोड किंवा आयडीने होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र एकूण किती रुपयांचा व्यवहार झाला, याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. तर डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनमार्फत याचा तांत्रिक खुलासा करण्यात आला नाही अथवा त्यांनी हे व्यवहार बंद करण्यासाठी कोणती पावले उचलली याबाबत माहिती पोलिसांना पुरवली नाही. त्यामुळे दोन महिन्यांपासून सुरू असलेला पोलीस तपास कारवाईपर्यंत पोहोचलेला नाही. अजूनही शहरात अथवा इतर ठिकाणी असे अनधिकृत कॉल एक्स्चेंज सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.