शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर कत्तलखाने बंद करा

By admin | Updated: January 16, 2015 05:43 IST

राज्यातील महापालिका, नगरपालिका क्षेत्रात सर्रासपणे सुरु असलेले बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने राज्य

अकोला : राज्यातील महापालिका, नगरपालिका क्षेत्रात सर्रासपणे सुरु असलेले बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिले आहेत. बहुतांश कत्तलखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त नसून, यासंदर्भात स्वायत्त संस्थांच्या कारभारावर न्यायालयाने नाराजी दर्शवली.महापालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरु आहेत. या व्यवसायातील आर्थिक उलाढाल लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध कत्तलखाने उभारले गेले आहेत. परिणामी गोधन चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. तद्वतच, कत्तलखान्यांमध्ये संबंधित स्वायत्त संस्थांनी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक असताना, नियमांना फाटा दिला जातो. कत्तलखान्यांवर अंकूश ठेवण्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य विभागाकडे असली, तरी संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. ही बाब जनहित याचिके द्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. याचिकेतील गंभीर मुद्यांची दखल घेत कत्तलखान्यांची स्थिती व त्यांच्यावरील कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिले होते. असे कत्तलखाने बंद करण्याचे आदेश न्या़ अभय ओक व अजय गडकरी यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)