शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘क्लिनिकल ट्रायल्स’चे प्रमाण अवघे १.४ %

By admin | Updated: May 21, 2016 05:12 IST

देशात आजारांची लागण झपाट्याने होत असली तरीही वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन उल्लेखनीय नाही.

मुंबई : जगातील एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे देशात आहेत. देशात आजारांची लागण झपाट्याने होत असली तरीही वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन उल्लेखनीय नाही. जगात होणाऱ्या एकूण ‘क्लिनिकल ट्रायल’मधील फक्त १.४ टक्के इतक्याच ट्रायल देशात होत असल्याचे ‘इंडियन सोसायटी फॉर क्लिनिकल रिसर्च २०१६’(आयएससीआर)च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. २० मे रोजी ‘जागतिक इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल डे’ साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून परळच्या केईएम रुग्णालयात आयएससीआरतर्फे एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत देशातील ‘क्लिनिकल ट्रायल’विषयी असणारे गैरसमज आणि जागरूकतेचा अभाव मोठे अडसर असल्याचा सूर तज्ज्ञांचा होता. आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर काम करणे, रुग्ण जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करणे, फार्मसी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘क्लिनिकल ट्रायल’ हे विषय सुरू करावेत, असे उपाय सुचवण्यात आले. जगातील एकूण लोकसंख्येपैकी १७ टक्के लोकसंख्या देशात आहे. पण, या तुलनेत संशोधनाचे प्रमाण अत्यल्प आहे. मानवासाठी नवीन औषध तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे १२ ते १५ वर्षांचा कालावधी लागतो. १० हजार औषधी द्रव्यांचा अभ्यास केल्यास त्यापैकी केवळ १० औषधी द्रव्य ही औषधांसाठी वापरण्यास उपयुक्त असल्याचे आढळून येते. त्यामुळेच आजारांचे प्रमाण पाहता नवीन औषधनिर्मितीला चालना मिळणे आवश्यक आहे. देशात फक्त ६ टक्के केंद्र ‘क्लिनिकल ट्रायल’साठी प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध आहेत. तर, केलेल्या ‘क्लिनिकल ट्रायल’पैकी फक्त ९ टक्के ट्रायलचे डिजिटलायझेशन केले जात असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)लोगो डिझाईन स्पर्धा आयएससीआरने लोगो बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ‘क्लिनिकल ट्रायल आणि रुग्णांसाठी त्याचे मूल्य’ ही संकल्पना दिली होती. या स्पर्धेची विजेती मेरील माम्मेन (२६) ठरली आहे. ही मुलगी जनुकीय विकृतीमुळे होणाऱ्या दुर्मीळ अशा पॉम्पे आजारग्रस्त आहे.