शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सेनेला स्पष्ट बहुमत

By admin | Updated: February 24, 2017 07:20 IST

ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला २५ वर्षांच्या सत्ताकाळात प्रथमच

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला २५ वर्षांच्या सत्ताकाळात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत मित्रपक्ष भाजपानेच शिवसेनेला आव्हान देत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या यशापयशाबाबत शंका व्यक्त केल्या जात असताना तब्बल ६७ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने ठाण्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या जागांमध्ये १५ जागांची भर पडली आहे. तर मागील वेळी केवळ आठ जागा मिळवणाऱ्या भाजपाला २३ जागा मिळाल्याने या पक्षालाही १५ जागांचा लाभ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ जागांवर विजय मिळवत आपले पूर्वीचे संख्याबळ टिकवून ठेवले. काँग्रेस ३ तर एमआयएमने मुंब्य्रात करिष्मा दाखवत दोन जागांवर विजय मिळवला आहे. दोन जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली. ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी झालेल्या मतदानात १२ लाख २८ हजार ६०६ मतदारांपैकी ७ लाख २४ हजार ९०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ६ लाख ६७ हजार ५०४ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ९५ हजार ९३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, तर ५ लाख ६१ हजार ८७ महिला मतदारांपैकी ३ लाख २८ हजार ९६२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. ३३ प्रभागांमध्ये सर्वच ठिकाणी मतदानाचा टक्का मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढलेला दिसून आला. दरम्यान, २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५६.५७ टक्के आणि २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५३.२५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यापूर्वीच्या अनुभवानुसार मतदानाचा टक्का कमी असेल, तर त्याचा फायदा शिवसेनेला झालेला दिसून आला. २००७ आणि २०१२ मध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले होते. २०१२ मध्ये द्विपॅनल पद्धत होती. परंतु, स्पष्ट बहुमतासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागली होती. यंदा मात्र मतदानाचा टक्का वाढल्याने त्याचा फायदा भाजपाला होईल, अशी शक्यता होती. तसे झालेही. भाजपाच्या वाट्याला ८ वरून २३ जागा आल्या, तर शिवसेनेच्या जागांमध्ये ५३ वरून ६८ अशी वाढ झाली. धक्कादायक पराभव नौपाड्यातील सहा वेळा सलग निवडून येणारे विलास सामंत, हिराकांत फर्डे, सुजाता पाटील, अनिता बिर्जे, शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा पुतण्या ठाणे महापालिकेतील विद्यमान नगरसेवक मंदार विचारे, शिवसेना उपनेते माजी आमदार अनंत तरे याचा भाऊ संजय तरे, त्यांची पत्नी विद्यमान नगरसेविका महेश्वरी तरे, माजी महापौर स्वत: हरिश्चंद्र पाटील, त्यांची सून स्नेहा पाटील, शिवसेनेच्या ठाणे जिल्हा संघटक अनिता बिर्जे, सुधीर भगत, गिरीश राजे, रेश्मा पाटील, उज्ज्वला फडतरे, बालाजी काकडे, राधा फतेबहादूर सिंग, संजय सोनार, रिपाइंचे ठाणे शहराध्यक्ष रामभाऊ तायडे, भाजपाचे संजय घाडीगावकर यांची पत्नी स्वाती घाडीगावकर, स्वाती देशमुख आणि राष्ट्रवादीच्या मनीषा साळवी यांचा समावेश आहे. दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे हे सलग सहा टर्म निवडून येणारे होते. परंतु, या निवडणुकीत त्यांच्यासह त्यांचे बंधू शैलेश शिंदे यांचा पराभव झाला. परमार प्रकरणात ज्यांचे नाव होते, असे सुधाकर चव्हाण, त्यांची पुतणी तेजस्विनी चव्हाण यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. या घराण्यांना बसला धक्काठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे खासदार राजन विचारे, एच.एस. पाटील आणि आमदार सुभाष भोईर या घराण्यांना धक्का बसला आहे. एच.एस. पाटील यांच्यासह त्यांच्या सुनेचा पराभव झाला असून पत्नी कल्पना पाटील विजयी झाल्या. खासदार राजन विचारे यांना मात्र जबरदस्त धक्का बसला असून त्यांचा पुतण्या मंदार विचारे याचा पराभव झाला आहे.ही घराणेशाही टिकलीमात्र, त्याच वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश आणि आमदार प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक, पुत्र पूर्वेश सरनाईक आणि पीए संदीप डोंगरे व त्यांची पत्नी आशा डोंगरे हे सारे विजयी झाल्याने शिंदे-सरनाईक यांच्या घराणेशाहीला मतदारांनी स्वीकारले.