शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बनणार स्वच्छता ‘सैनिक’

By admin | Updated: September 5, 2016 02:44 IST

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने शाळेत आणि त्यांचे घर, सोसायटीपासून स्वच्छतेला सुरुवात करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्रमुख शिक्षकांच्या सहभागाने नुकतीच विष्णुदास भावे नाट्यगृहात या उपक्रमाच्या माहितीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेतंर्गत आयुक्तांनी ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना स्पष्ट केली. कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे १०० टक्के वर्गीकरण होईल या कल्पनेतून ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून नवी मुंबईची भावी पिढी शहर स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम करेल, आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहर आणखी स्वच्छ व सुशोभित होईल, असा विश्वास मुंढे यांनी व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ नुसार तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्मितीच्या पातळीवरच कचरा वर्गीकरण करणे हे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने २ आॅक्टोबरपर्यंत शहरात १०० टक्के ओला - सुका कचरा वर्गीकरण झाले पाहिजे, हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. कार्यशाळेत संकल्पनेविषयीची माहितीपुस्तिका व सीडी वितरीत करण्यात आली.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार शिक्षणाधिकारी संदीप सांगवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>मुख्याध्यापक, शिक्षकांचा सहभाग‘स्वच्छता सैनिक’ या संकल्पनेंतर्गत प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक हे मुख्य प्रशिक्षक व शिक्षक हे वर्गप्रमुख असणार आहेत. प्रत्येक वर्गशिक्षक वर्गातून एका मुलाची व मुलीची स्वच्छता सैनिक कर्णधार म्हणून निवड करतील. हे कर्णधार वर्गातील स्वच्छताविषयक उपक्र मांचा आढावा घेतील. याशिवाय वरच्या वर्गातून आणखी एक स्वच्छता सैनिक निवडला जाईल, जो शालेय स्तरावरील स्वच्छता कार्यक्र मांचे नियोजन व अवलोकन करेल. अशाप्रकारे वरच्या वर्गातून १० ते १५ विद्यार्थ्यांचा समूह निवडून शालेय स्तरावर स्वच्छताविषयक विविध कार्यक्र म राबविण्यात येतील.>सोसायटीत साधारणत: १०-१२ मुलांचा एक गट निर्माण केला जाणार आहे. या गटाव्दारे त्यांच्या कुटुंबात तसेच त्यांच्या सोसायटीत कचरा वर्गीकरण योग्य रीतीने होते आहे की नाही तसेच तो वेगवेगळ्या डब्यात ठेवला जातो आहे की नाही, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीत देतानाही वेगवेगळा दिला जातो आहे की नाही याचे निरीक्षण केले जाईल.कचरा वर्गीकरण न करणाऱ्या कुटुंबाला त्याचे महत्त्व ही मुले पटवून देतील तसेच घरकाम करणाऱ्या व्यक्तींना आणि वॉचमन यांनाही याबाबतचे महत्त्व समजून सांगतील.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, शिक्षणाधिकारी संदीप सांगवे आदी उपस्थित होते.