शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सवरांच्या खात्यात साफसफाई

By admin | Updated: October 16, 2016 00:50 IST

गेले अनेक महिने भ्रष्टाचार, सावळागोंधळ आणि हायकोर्टाच्या दणक्याने अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आदिवासी विकास खात्यात साफसफाई सुरू झाली आहे.

- यदु जोशी,  मुंबईगेले अनेक महिने भ्रष्टाचार, सावळागोंधळ आणि हायकोर्टाच्या दणक्याने अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आदिवासी विकास खात्यात साफसफाई सुरू झाली आहे. खात्याचे मंत्री विष्णू सवरा यांचे खासगी सचिव कल्याण औताडे यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.या खात्याच्या एकूणच कारभाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीव्र नाराज आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी कुपोषण निर्मूलनासाठी घेतलेल्या बैठकीतही ही नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली होती. या खात्यातील विशिष्ट अधिकाऱ्यांमध्ये चाललेल्या संगनमताबाबतची तक्रार १५ दिवसांपूर्वी पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यात विभागाच्या सचिवांसह औताडेंपर्यंतच्या तक्रारी होत्या, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची विश्वासार्हता अधुनमधून तपासत राहिले पाहिजे, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी सावरांशी बोलताना केल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी औताडे यांना तडकाफडकी काढण्यात आले. आता ते वित्त व लेखा या त्यांच्या मूळ विभागात परत जातील. सवरा यांच्या मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये दोन गट होते आणि ते एकमेकांना पाण्यात पाहत होते. त्यामुळे एकूणच वातावरण कलुषित झाले होते. औताडे विरुद्ध देवरे व पाटील असे चित्र निर्माण झाले होते. सवरा यांनी एका गटाला चाप लावला असला तरी दुसऱ्या गटातील लोकांनाही घरचा रस्ता दाखवून ते आपल्या कार्यालयाचे शुद्धिकरण करतील का या बाबत उत्सुकता आहे.गैरव्यवहारांच्या मुळाशी असलेल्या खात्यातील एका उपसचिवावरही लवकरच गंडांतर येऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी ज्या-ज्या अधिकाऱ्यांबद्दल नाराजी बोलून दाखविली त्यांना हटविले तर खात्यामध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात.साधेपणाचा गैरफायदासवरा यांच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन खात्यातील अधिकारी आणि कंत्राटदारांचे संगनमत आजही चालले आहे. स्वेटर खरेदीपासून निकृष्ट वह्यांच्या वाटपापर्यंत त्याची तार जुळलेली आहे. नवीन आयुक्त राजीव जाधव यांनी त्यांचे वरिष्ठ आणि कनिष्ठांमधील संगनमताला बऱ्यापैकी चाप लावला असला तरी घोटाळेबाजांमध्ये त्यांचे सँडविच केले जात आहे. प्रत्येकी १६०० ते १९०० रुपये किमतीचे वूलन स्वेटर खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. १९ पुरवठादारांपैकी केवळ तिघांचेच सॅम्पल पास करण्यात आले.