शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची मोहीम घरापासून करा

By admin | Updated: February 5, 2017 23:48 IST

भाजपाचे पदाधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली असली, तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी २ लाखांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़

सोलापूर : भाजपाचे पदाधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली असली, तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी २ लाखांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़ त्यामुळे आधी घरापासून सुरुवात करा, मग सार्वजनिक जीवनात स्वच्छ राहण्याची भाषा शोभून दिसेल, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला.सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना खा़ चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर चौफेर टीका केली़ मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विकासावर होणारे परिणाम, नोटाबंदीने जनतेची झालेली हालअपेष्ठा, अर्थव्यवस्थेवरील परिणाम आदी विषयांवर प्रकाश टाकला़ भाजपा-सेनेच्या भांडणाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राज्यात एकत्र काम करतात, यापूर्वी कोणत्याच सेनेच्या मंत्र्यांनी विरोध दर्शविला नाही़ आता नेमके निवडणुकीत भाजपाकडून औकात दाखवण्याची भाषा केली जाते आणि सेना निमूटपणे ऐकून घेते, हा सारा प्रकार जनतेची फसवणूक करण्यासाठी आहे़ सरकारच्या अपयशाचे खापर निवडणुकीत आपल्यावर फुटू नये यासाठी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आखलेली नियोजनबद्ध खेळी आहे़ यामुळे काँग्रेसला राजकारणात ‘स्पेस’ मिळू नये, झाला फायदा तर भाजपाचा अथवा सेनेचा व्हावा ही त्यामागची रणनीती आहे़ निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्रच येणार आहेत़ खा़ किरीट सोमय्या आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे सूतोवाच केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़