शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सिंधुदुर्गचा पॅटर्न राज्यभर राबविणार

By admin | Updated: September 10, 2016 00:10 IST

विनोद तावडे यांची माहिती : सर्व प्राथमिक शाळा ई प्रणालीने जोडणार

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांनाही स्वच्छता अभियानात प्रेरणादायी ठरणारा स्वच्छतेचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार आणि महाराष्ट्र स्वच्छतेत अव्वल बनविणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.देवगड दौऱ्यावर आलेल्या विनोद तावडे यांनी माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोगटे कुटुुंबीयांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, प्रकाश गोगटे, अभिषेक गोगटे, आदी उपस्थित होते.पत्रकाराशी संवाद साधताना तावडे यांनी इ-लर्निंग ही संकल्पना राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार असून, प्रत्येक शाळा संगणक प्रणालीने जोडण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांव्यतिरिक्त इतर शाळांमध्ये ही संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पदे भरताना कोकणला प्राधान्य२००९ नंतर नवीन शाळांना अनुदान देण्यात येणार नाही. त्यांना विनाअनुदानीत तत्त्वावर शाळा चालवाव्या लागणार आहेत. गटशिक्षणाधिकारी पदे भरताना कोकणाला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ७८ पदे दोन महिन्यांत भरण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.दोन वर्षांनी महामार्ग सुस्थितीत असेलमुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. भूसंपादनाचे ८० टक्के काम झाले असून, आॅक्टोबर महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. यावर्षी खड्डेमय झालेल्या महामार्गावर उपाययोजना केल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला. दोन वर्षांनी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महामार्ग सुस्थितीत असेल, असे तावडे यांनी सांगीतले.२0 पटसंख्येचा निर्णय डोंगराळ भागासाठी नाही२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना यापुढे गावातील मुख्य शाळांशी जोडण्यात येणार आहे. मात्र, डोंगराळ भागातील व मुलींच्या शाळांना यामधून वगळण्यात आले आहे. सामूहिक शिक्षण या संकल्पनेतून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुलांना वाहनाची व्यवस्था करून त्यांना मुख्य शाळांमध्ये आणण्यात येणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.