शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता दहावी : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांने दिली रुग्णालयात परीक्षा

By admin | Updated: March 14, 2017 21:17 IST

जेलरोड के.एन.केला शाळेमध्ये दहावीचा गणिताचा पेपर देण्यासाठी जात असलेला विद्यार्थी अनिकेत तीर्थरामानी याला मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेजवळ

नाशिक : जेलरोड के.एन.केला शाळेमध्ये दहावीचा गणिताचा पेपर देण्यासाठी जात असलेला विद्यार्थी अनिकेत तीर्थरामानी याला मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेजवळच वाहनाने धडक दिल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी बोर्डाकडून विशेष परवानगी घेतली आणि त्याने रुग्णालयातूनच गणिताचा पेपर दिला.जेलरोड अभिनव विद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत तीर्थरामानी याचा मंगळवारी सकाळी ११ ते २ पेपर असल्याने जेलरोड के.एन. केला शाळेमध्ये अनिकेतच्या वडिलांनी त्याला शाळेजवळ रस्त्यावर उतरविले. तेथुन अनिकेत रस्ता ओलांडत असताना के.एन. केला शाळेचे क्रीडा शिक्षक अजिज सय्यद हे आपल्या फिगो गाडीतुन (एमएच १५ सीएम ८९६१) प्रश्नपत्रिका घेऊन येत होते. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारा जवळच अनिकेतला वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. उपस्थित पालक व शाळेतील शिक्षकांनी त्याला त्वरित उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. शाळेतील पर्यवेक्षक आर. पी. गायकवाड यांनी सदरची घटना शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना कळविली. अनिकेत याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जाधव यांनी तत्काळ बोर्डाकडून परवानगी घेऊन अनिकेतला हॉस्पिटलमध्येच पेपर देण्याची परवानगी मिळवुन दिली.

 

अनिकेतवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सकाळी ११ वाजता जिल्हा परीक्षक उपशिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमध्ये सुपरवायझर नेमुन अनिकेतला गणिताचा पेपर देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच पेपर सोडविण्यासाठी ९ वीची विद्यार्थिनी रायटर म्हणून देण्यात आली होती. सदर अपघाताबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)