शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीरवर दाव्याची पहिली मागणी माझी!

By admin | Updated: August 14, 2016 01:18 IST

पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही.

नागपूर : पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही. सगळेच राजकीय पक्ष काश्मीरबाबतीत केवळ व्होट बँकेचे राजकारण करीत आहेत, असा थेट आरोप अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा यांनी शनिवारी लोकमतला दिलेल्या भेटीत केला.काश्मिरी लोकांच्या सुरक्षेसाठीच तेथे सेनेचे जवान तैनात आहेत. हे विसरून जेव्हा त्या सैनिकांवर दगडफेक होते तेव्हा त्यांनी सुरक्षेसाठी पॅलेट गन चालवली तर यात गैर काय? पण, आपले राजकारणी याचेही राजकारण करीत आहेत. सैनिकांची बाजू न घेता दगडफेक करणाऱ्यांप्रती कळवळा दाखवला जात आहे. राजकारण्यांच्या अशा वागणुकीमुळे सैनिकांचे मनोबल खचत आहे. हे फार धोकादायक आहे, याकडे बिट्टा यांनी लक्ष वेधेले. कलम ३७० हटवाकलम ३७० ने काश्मीरचे खूप नुकसान केले आहे. स्वायत्ततेचा तेथे गैरफायदा घेतला जात आहे. सरकार कोणतेही असो काश्मीरसाठी विशेष पॅकेज देत असते. अशा पॅकेजमुळे त्या राज्यात ऐतखाऊ वृत्ती वाढत आहे. याचा सर्वाधिक गैरफायदा येथील फुटीरवादी संघटना उचलत आहेत. एकीकडे सरकारच्या पॅकेजचा फायदा मिळवायचा आणि दुसरीकडे आयएसआयकडूनही निधी लाटायचा, असा गैरप्रकार काश्मिरात सुरू आहे. त्यामुळे ३७० कलम काढून टाकावे.माझ्यावर चित्रपट का नाही?‘उडता पंजाब’ चित्रपट नुकताच येऊन गेला. यात तर पंजाबचे असे चित्रण होते जणू येथील प्रत्येक घरात गर्दुले राहतात. व्यवसायाच्या दृष्टीने नकारात्मक विषय कॅश करता येतात हे फिल्म निर्मात्यांना चांगले माहीत आहे. म्हणूनच असे अवास्तविक चित्रपट काढले जातात. मी देशाच्या हिताचे बोलतो म्हणून माझ्यावर आतापर्यंत १६ हल्ले झाले. हे कुणा चित्रपट निर्मात्याला का दिसले नाही. बिट्टावर चित्रपट काढावा, असे कुणा निर्मात्याला का वाटले नाही, असा सवालही त्यांनी केला.