शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

वाहतूककोंडी ठरतेय जीवघेणी

By admin | Updated: January 22, 2017 02:45 IST

नव्या प्रभाग रचनेमुळे १०५ व १०६ या दोन्ही प्रभागांना भेडसावणारी एकच प्रमुख समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी. मुलुंड पूर्वेस नवघर रोड हा एकमेव मार्ग पूर्व द्रुतगती मार्गास जोडणारा

मुंबई : नव्या प्रभाग रचनेमुळे १०५ व १०६ या दोन्ही प्रभागांना भेडसावणारी एकच प्रमुख समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी. मुलुंड पूर्वेस नवघर रोड हा एकमेव मार्ग पूर्व द्रुतगती मार्गास जोडणारा आहे. त्यामुळे येथे बाहेरून येण्या-जाण्यासाठी वाहतूककोंडीचा सामना येथील मतदारांना करावा लागतो. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या या दोन्ही प्रभागांच्या प्रचारात केंद्रस्थानी असणार आहे. वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी केळकर कॉलेजकडून थेट खार जमिनीतून गोरेगाव लिंक रोडला जाणारा ९० फुटी रस्ता गेली २५ वर्षे प्रस्तावित आहे. अनेकदा प्रत्येक उमेदवाराने येथील मतदारांना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, परंतु आजही ते कोणत्याही राजकीय पक्षाने पूर्ण केलेले नाही. आता तर खार जमिनीची लिजही संपलेली आहे, परंतु राजकीय इच्छाशक्तीचा येथे अभाव दिसून आला आहे. याच प्रभागात वामन मुरांजन शाळेच्या लगत असलेला सरकारी भूखंडावर क्रीडा संकुल आरक्षित आहे. दोन वर्षांपूर्वी येथे झोपडपट्टीचे अतिक्रमण झालेले होते. तो लढा सर्वच पक्षांनी एकत्रित येऊन लढला. मात्र, त्याच गतीने येथे क्रीडा संकुल व्हावे, यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. वास्तविक, या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणे झालेली असूनही, तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशा आविर्भावात सारेच राजकीय पुढारी वावरताना दिसतात. मात्र, या पालिका निवडणुकीत बहुसंख्य सुशिक्षित मतदारांकडून हे कळीचे मुद्दे उपस्थित केले जातील याची शक्यता अधिक आहे. (प्रतिनिधी)मतदारांच्या मागण्याया प्रभागातील रस्त्यावरील दिव्यांचा मुद्दा ऐरणीवर असून, भाजीपाल्यासाठी वेगळी जागा, सार्वजनिक शौचालय, मासळीबाजार, अ‍ॅम्पी थिएटर, कचऱ्याचे नियोजन व दिशादर्शन फलकांची मागणी येथील मतदारांनी केली आहे. त्यामुळे या प्रमुख समस्यांचा इच्छुक महिला उमेदवारांनी अभ्यास करावा आणि नंतर मते मागावीत, असे मतदारांचे म्हणणे आहे.