शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिटी टॅक्सी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 16, 2016 02:44 IST

राज्य परिवहन विभागाकडून सर्व टॅक्सी सेवांसाठी ‘सिटी टॅक्सी योजना’लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्यानंतर त्याचा अभिप्राय शासनाकडे

मुंबई : राज्य परिवहन विभागाकडून सर्व टॅक्सी सेवांसाठी ‘सिटी टॅक्सी योजना’लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्यानंतर त्याचा अभिप्राय शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र पाच महिने उलटूनही या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली नाही आणि त्याबद्दल विचारही करण्यात आलेला नाही. राज्य परिवहन विभागाने सर्व टॅक्सी सेवांसाठी एकच नियमावली आणि योजना आणण्याचा निर्णय घेत नव्या सिटी टॅक्सी योजनेची आखणी केली. काळी पिवळी टॅक्सी, फ्लिट टॅक्सी तसेच अ‍ॅग्रीगेटर्सकडून चालविल्या जाणाऱ्या टॅक्सी सेवा समान पातळीवर आाण्यासाठी ‘सिटी टॅक्सी योजना २0१५’ वर काम सुरू केले. याबाबतची अधिसूचना २९ सप्टेंबर २0१५ रोजी काढल्यानंतर नागरिकांना काही सूचना व हरकती सादर करण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत परिवहन विभागाकडून देण्यात आली. हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याचा एक प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र पाच महिन्यांपूर्वी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवूनही त्यावर निर्णय झालेला नसल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत शासनाकडून कोणती माहितीही परिवहन विभागाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा डोळ्यांसमोर ठेवून आखलेला हा प्रस्ताव अजूनही मंजुरीच्याच प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. सुरक्षेचा मुद्दानवी दिल्लीत काही महिन्यांपूर्वी उबर चालकाने एका महिला प्रवाशावर बलात्कार केला होता. त्याचे पडसाद देशभरात उमटल्यानंतर महाराष्ट्रातही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे आला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांवर बंदी आणावी किंवा त्यावर कठोर निर्बंध लादावेत अशी मागणी होऊ लागली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी टॅक्सी कंपन्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आणि त्यांना सुरक्षेसंदर्भात सूचनाही करण्यात आल्या. मात्र करण्यात आलेल्या सूचनांवर बराच वाद टॅक्सी कंपन्या आणि परिवहन विभागात झाल्याने त्यावर तोडगा काही निघाला नाही. त्याचदरम्यान खाजगी टॅक्सी सेवा महिला प्रवाशांना सुरक्षा देण्यात कमी पडत असतानाच अनधिकृतपणे भाडे वसूल करत असल्याचा आरोप काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून करण्यात आला आणि त्यावर तोडगा काढण्याच्या मागणीचा जोर धरण्यात आला.