शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिटी हॉस्पिटल जीवनदायी योजनेतून बाद!

By admin | Updated: July 6, 2014 23:37 IST

राज्यातील पहिलीच कारवाई

अकोला : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून रक्कम लाटण्यासाठी गोरेगाव येथील इसमावर केलेल्या शस्त्रक्रियेत हेराफेरी करणार्‍या सिटी हॉस्पिटलला जीवनदायी आरोग्य योजनेतून निलंबित करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे लॉग इन तातडीने बाद करण्यात आले असून, शस्त्रक्रिया करणारे डॉ. अतुल महाशब्दे व डॉ. उमेश गडपाल यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. मीना लोचणी यांनी केली आहे. तत्पूर्वी पांडुरंग वाघ यांना उत्कृष्ट दर्जाचे उपचार देण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.एखाद्या रूग्णालयाला जीवनदायी योजनेतून बाद करण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. गोरेगाव खु. येथील रहिवासी पांडुरंग दगडू वाघ (५२) यांना पाठीचा त्रास असल्याने १४ मे रोजी रामदास पेठेतील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी प्राथमिक उपचार करून, दुसर्‍याच दिवशी १५ मे रोजी पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वाघ यांच्या पाठीमध्ये दोन स्क्रू टाकण्यात आल्याचे डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितले व तसे एक्सरेमध्येसुद्धा दाखवून दिले होते. या शस्त्रक्रियेच्यावेळी वाघ यांच्या पाठीत टाकलेले स्क्रू त्याचवेळी काढण्यात आल्याचे एका दुसर्‍या डॉक्टरने पुन्हा एमआरआय व एक्सरे काढल्यानंतर समोर आले. त्यानंतर वाघ यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत गौडबंगाल असल्याचे संबंधित डॉक्टरसह रुग्णाच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची विचारणा केली असता, दोन्ही डॉक्टरांनी त्यांना टाळले. जीवनदायी आरोग्य योजनेतून सुमारे ४0 हजारांच्यावर रक्कम मिळविण्याच्या बेतात असलेल्या डॉक्टरांनी वाघ यांच्याकडूनही १५ हजार रुपये घेतले होते. हा प्रकार उघडकीस आणणारे वृत्त दैनिक लोकमतने प्रकाशित केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली. त्यानंतर जीवनदायी आरोग्य योजनेचे मुंबई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक यांनी सिटी हॉस्पिटलला जीवनदायी योजनेतून निलंबित करण्याचे आदेश देवून डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.