शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मंडळे लागली तयारीला

By admin | Updated: August 25, 2016 03:33 IST

गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. उत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्याने मंडळांमधील तयारी वेगात सुरू आहे.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. उत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्याने मंडळांमधील तयारी वेगात सुरू आहे. राजकीय पक्षांनी दहीहंडीचे वातावरण तापवल्याने गेल्या दोन दिवसांत कामाला थोडा ब्रेक लागला असला तरी शुक्रवारपासून पुन्हा कामांना वेग येईल. भव्य मूर्ती आणणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी मंडपांचे काम सुरू करून सजावटीस सुरूवात केली आहे. इतर मंडळे मात्र मंडप उभारण्यात मग्न आहेत. गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीच उत्सवाच्या रुपरेषांसंदर्भात मंडळांची आखणी सुरू होते. मंडपापासून ते अगदी सजावटीपर्यंतच्या संदर्भात बैठका, चर्चा सुरू होतात आणि उत्सव पंधरवड्यावर आला की प्रत्यक्ष कामाला सुरूवात होते. आपापली दैनंदिन कामे उरकली, की मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आखणीला बसतात. आताही उत्सव दहा दिवसांवर आल्याने मंडळांतील कामाची लगबग वाढली आहे. मूर्ती अद्याप मंडपात आलेल्या नाहीत. शनिवार-रविवारपासून वेगवेगळ््या मंडळात मूर्ती येण्यास सुरूवात होईल. मंडप, सजावट, रोषणाईची कामे सुरू झाली असली, तरी दहीहंडीचा उत्साह ओसरला की त्या कामांनाही वेग येईल. ठाण्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडपाचे काम पूर्ण होत आले आहे. ज्यांचे काम पूर्ण झाले आहे, त्यांच्या सजावटीच्या बैठका सुरू आहेत. ज्यांची सजावट मोठी आहे, त्यांनी त्याची सुरूवात केली आहे. सजावट पूर्ण झाल्याशिवाय मूर्ती न आणण्याचा काही मंडळांचा पवित्रा कायम आहे. १ सप्टेंबरपासून मात्र ठाण्यातील मंडळांच्या मंडपात बाप्पाचे आगमन होईल. सुरक्षेपासून इतर कारणे विचारात घेऊन काही मंडळे दोन दिवस अगोदर मूर्ती आणणार आहे. ज्यांची त्याच दिवशी वाजत-गाजत मिरवणुकीने मूर्ती आणण्याची परंपरा कायम आहे, ती मंडळे त्याच दिवशी मूर्ती आणणार आहेत. परराज्यांतील मूर्ती मात्र दोन दिवसांत रवाना होतील.>सजावटीवर प्रभाव निवडणुकांचासजावटीचे विषय नेमके कोणते असतील, यावर सर्वच मंडळांनी सध्या मौन बाळगले आहे. परंतु यंदा निवडणुकीचा काळ असल्याने शहराचा विकास, स्मार्ट सिटी यासारखे विषय सजावटीत प्रामुख्याने पाहायला मिळतील. सध्या मंडपाचे काम सुरू आहे. दहीहंडी झाल्यानंतर सजावटीच्या कामाला सुरूवात होईल. आमचे मंडळ आदल्या दिवशी गणेशमूर्ती आणणार आहे.- संदीप नटे, शिवाईनगर सार्वजनिक मित्र मंडळ, शिवाईनगर.