शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात सिडकोच्या ८१ अधिकाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: September 5, 2016 02:38 IST

सिडकोतील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षांपूर्वी दक्षता विभागाची स्थापना केली.

नवी मुंबई : सिडकोतील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षांपूर्वी दक्षता विभागाची स्थापना केली. या विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या तक्रारी असलेल्या सिडकोच्या ८१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यापैकी २७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध ३0 विभागांच्या माध्यमातून सिडकोचा कारभार चालतो. या प्रत्येक विभागातील कारभार पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त व्हावा, यासाठी दक्षता विभागाच्या माध्यमातून विशेष प्रयास केले जातात. लोकांच्या आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेवून त्याची चौकशी केली जाते. २0१५-१६ या आर्थिक वर्षात दक्षता विभागाला ४४९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी बहुतांशी तक्रारी अभियांत्रिकी, इस्टेट आणि भूमी व भूमापन विभागाशी संबंधित आहेत. या तक्रारी निकाली काढतान दक्षता विभागाने २७ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस प्रशासनाला केली आहे. तर कामांत हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून ४१ कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. दोन कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले. ५ कर्मचाऱ्यांना लेखी समजत तर एका कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आली आहे.पोलीस महासंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नेमणूक करण्यात आली. भ्रष्टाचाराविषयीच्या तक्रारींत घट व्हावी, असेच त्यांचे प्रयत्न होते. सध्या विभागाचे प्रमुख म्हणून विनय कारगावकर हे काम पाहत आहेत. त्यामुळे जुन्या तक्रारींचा निपटारा करण्याबरोबरच भ्रष्टाचाराशी संबंधित नवीन तक्रारीत वाढ होवू नये, या दृष्टीने ठोस उपाययोजनेची गरज आहे.>भ्रष्टाचार निर्मूलनासाठी उपाययोजनाभ्रष्टाचाराच्या विविध तक्रारींमुळे मलिन झालेली सिडकोची प्रतिमा सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दक्षता विभागाची स्थापना केली होती. पोलीस महासंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नेमणूक करण्यात आली. डॉ. सरवदे यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने विविध उपाययोजना आखल्या.