शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांपूर्वीचा ‘चॉपर मास्टर’ राजन

By admin | Updated: November 5, 2015 03:03 IST

सुमारे ३० वर्षांपूर्वी राजनला अटक केल्याची घटना टिळकनगर पोलिसांना आजही स्पष्ट आठवते. हत्याराने भरलेली रिक्षा घेऊन राजन राजावाडी रुग्णालय परिसरातून जाणार असल्याची माहिती

- मनीषा म्हात्रे,  मुंबईसुमारे ३० वर्षांपूर्वी राजनला अटक केल्याची घटना टिळकनगर पोलिसांना आजही स्पष्ट आठवते. हत्याराने भरलेली रिक्षा घेऊन राजन राजावाडी रुग्णालय परिसरातून जाणार असल्याची माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. राजनने पोलिसांवरच चॉपरने हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले. त्या वेळी उपनिरीक्षक राजाराम व्हनमाने या पथकामध्ये होते. शस्त्रसाठ्यासह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात राजनला अटक केली. ‘मला नमूद वेळी नमूद ठिकाणी बेकायदेशीर हत्यार बाळगल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडले,’ असा एका ओळीचा जबाब त्याच्याकडून लिहून घेण्यात आला होता, असे व्हनमाने यांनी सांगितले. यात राजन जामिनावर सुटला आणि देशाबाहेर पसार झाला. मूळचा फलटण जिल्ह्यातील गिरवी गावचा राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन उर्फ ‘नाना’८०च्या दशकात सहकार सिनेमाबाहेर ब्लॅकमध्ये तिकिटे विकायचा. त्यानंतर तो डॉन राजन महादेव नायर उर्फ बडा राजनच्या संपर्कात आला. छोटा राजन हा कंपनीच्या दुसऱ्या फळीतील मास्टर होता. राजन हा चॉपर चालवण्यात पटाईत होता. त्यामुळे तो ‘चॉपर मास्टर’ म्हणून प्रसिद्ध झाला.