शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘चिनी ड्रॅगन’चा कर्करुग्णांना दिलासा

By admin | Updated: September 15, 2014 08:49 IST

चीन सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लहान मुलांच्या खेळण्यांपासून थेट इलेक्ट्रॉनिक गॅझेटपर्यंत सगळीकडे संचार करणारा ‘चिनी ड्रॅगन’ आता आरोग्य क्षेत्रालाही गवसणी घालण्याच्या प्रयत्नात

मुंबई : चीन सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लहान मुलांच्या खेळण्यांपासून थेट इलेक्ट्रॉनिक गॅझेटपर्यंत सगळीकडे संचार करणारा ‘चिनी ड्रॅगन’ आता आरोग्य क्षेत्रालाही गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहे. भारतामध्ये कर्करोगावर जे उपचार केले जातात, ते रुग्णांसाठी अत्यंत क्लेषदायी ठरतात, मात्र चीनमध्ये आता त्रासविरहित आणि लवकर दिलासा देणारे नवीन तंत्रज्ञान वापरून कर्करोगावर उपचार केले जातात, त्यामुळे कर्करोगावरील उपचारांमध्ये चीनने आघाडी घेतली आहे. भारतामध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी तीन पद्धतींचा वापर केला जातो. कर्करोग झाला असेल तर शस्त्रक्रिया करणे, केमो थेरपी आणि रेडिएशन हेच उपचार दिले जातात. केमोथेरपी आणि रेडिएशन घेत असताना, रुग्णांचे केस जाणे, उलट्या होणे, खाण्याची इच्छा न होणे, इतर अवयवांवरदेखील परिणाम होणे असे परिणाम दिसतात. मात्र चीनमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार केले जात आहेत. यामध्ये रुग्णांना त्रास होत नाही आणि हे उपचार कमी दिवसांत होतात. या उपचारांचे वैशिष्ट्य म्हणजे याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होत नाही, फक्त कर्करोगाच्या ट्युमरवर होतो. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणूनदेखील त्याच्यावर उपचार केले जातात, असे चीनमधील ‘फूडा कर्करोग रुग्णालया’चे उपाध्यक्ष डॉ. ली. हैबो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रुग्णाला त्रास न होता उपचारासाठी ‘क्रायोसर्जिकल अ‍ॅब्लेशन’ (सीएसए), ‘फोटोडायनॅमिक थेरपी’ (पीडीटी), ‘सीड नाईफ थेरपी’, ‘कम्बाईन इम्युनोथेरपी फॉर कॅन्सर’ (सीआयसी) या चार उपचार पद्धती चीनमध्ये वापरण्यात येत आहेत. या पद्धतींना यूएस अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यांचा शोध अमेरिकेमध्ये लागला आहे. मात्र चीनमध्ये या पद्धती वापरून अनेक कर्करुग्णांचा आजार बरा केला जात आहे. भारतातूही गेल्या दोन वर्षांत ५० रुग्ण चीनमध्ये येऊन उपचार घेऊन गेले आहेत. जगभरातील रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत असतात, असे डॉ. हैबो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)