शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

चिमुरड्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

By admin | Updated: May 24, 2017 01:54 IST

हृदयाच्या चारही कप्प्याचे कार्य सामान्यपणे सुरु नसून त्यातच हृदय उजव्या बाजूला असल्याने सहा वर्षीय संकेत मोरेची प्रकृती खालावली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: हृदयाच्या चारही कप्प्याचे कार्य सामान्यपणे सुरु नसून त्यातच हृदय उजव्या बाजूला असल्याने सहा वर्षीय संकेत मोरेची प्रकृती खालावली होती. औरंगाबाद, पुण्यात उपचार करुनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला मुंबईला हलवण्यात आले. मुंबईच्या सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून त्याला जीवनदान मिळाले आहे. संकेत हा मूळचा औरंगाबादचा असून त्याचे वडील शेतकरी आहेत. संकेतचे हृदय उजव्या बाजूला आहे. त्यातच त्याच्या हृदयाचे कार्य सामान्यपणे सुरु नव्हते. हृदयाला एकूण चार कप्पे असतात. प्रत्येक कप्प्याचे एक विशिष्ट कार्य आहे. त्याच्या हृदयाच्या कप्प्यांचे आणि धमण्यांचे कार्य परस्पर बदले होते. त्यामुळे त्याच्या हृदयात गुंतागुंत वाढली होती. यामुळे संकेतचा त्रास बळावला असल्याचे बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीपाल जैन यांनी सांगितले. पुण्याचे बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी संकेतला मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला. संकेतच्या हृदयात छिद्र होते, त्यातच कप्प्यांचे आणि धमणीचे कार्य सुरळीत सुरु नव्हते. त्यामुळे गुंतागुंत वाढली होती. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणारी धमणी छोटी होती. यामुळे सामान्यपणे अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाते. पण, संकेतच्या हृदय कार्यातील बिघाडामुळे अशुद्ध रक्त कमी प्रमाणात फुफ्फुसाकडे जात होते. या दोन अवयवांना जोडणाऱ्या भागात धमण्यांची गर्दी असल्याने संकेतचा त्रास वाढला होता. संकेतच्या प्राथमिक तपासण्या पूर्ण झाल्यावर त्याला होणारा त्रास शोधून काढण्यासाठी त्याची इकोकार्डिओग्राफी करण्यात आली. तपासणीनंतर तीन टप्प्यांत शस्त्रक्रिया केली. पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रियेत अशुद्ध रक्ताच्या शुद्धीकरणासाठी थेट फुफ्फुसांकडे वळवले. हृदयाचे छिद्र बंद करुन हृदयाच्या डाव्या कप्प्यात कृत्रिम ट्यूब लावली. शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीचा टप्पा म्हणजे कृत्रिमरित्या हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरु करणे हा होता. पुढचे काही दिवस रक्तदाबाचे औषध सुरु राहील. आता संकेत खाऊ लागला असून थोड्याफार प्रमाणात फिरत आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.