शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

चिल्ड्रन होम विलीनीकरण रखडले

By admin | Updated: October 20, 2016 05:53 IST

शासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या दीड महिन्यांत मानखुर्द बालसुधारगृहात सहा बालकांचा मृत्यू झाला आहे.

समीर कर्णुक,

मुंबई- शासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या दीड महिन्यांत मानखुर्द बालसुधारगृहात सहा बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मानखुर्द बालसुधारगृह सध्या चर्चेत आले आहे. चिल्ड्रन होम या संस्थेचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी गेल्या वर्षांपासून होत आहे. मात्र मंत्र्यांच्या आदेशानंतरही शासकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रस्ताव अद्यापही धुळखात पडून आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कर्मचारी वर्ग करत आहे.समाजातील अनाथ, वंचित, गतीमंत आणि आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृह आहेत. ‘द चिल्ड्रेन्स एन्ड सोसायटी’ या बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेकडे या संपूर्ण सुधारगृहांचा कारभार आहे. राज्याचे गृहमंत्री या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्षपद महिला व बालविकासमंत्री यांच्याकडे आहे. मात्र या नेत्यांना या बालसुधारगृहांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या सुधारगृहांची मोठी दुरावस्था आहे. मुलांना राहण्यासाठी योग्य जागा नाही, पौष्टीक अन्न नाही, कपडे नाहीत, पिण्यासाठी योग्य पाणी नाही अशा अनेक समस्या मुलांना भेडसावत आहेत. परिणामी येथील कर्मचाऱ्यांना बाहेरुन देणगीदार शोधावे लागत आहेत. त्यामुळे या संस्थेचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील कर्मचारी करत आहेत. त्याुनसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत काही महिन्यांपूर्वींच संस्था विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापही पावले उचललेली नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)>‘सचिव मिटिंगमध्ये व्यस्त’या प्रकरणी महिला व बालविकास प्रधान सचिव संजय कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे कारण सांगून या विषयावर बोलण्यास नकार दिला.