शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच केला जन्मदात्याचा खून

By admin | Updated: July 21, 2016 22:04 IST

घरातील संपत्तीचा वाद विकोपाला गेला असताना राग अनावर झाल्याने पोटच्या मुलाने ६५ वर्षीय जन्मदात्या पित्याच्या गुप्तांगावर लाथांनी वार करून बुधवारी सकाळी जखमी केले.

ऑनलाइन लोकमत

आष्टी (गडचिरोली) : घरातील संपत्तीचा वाद विकोपाला गेला असताना राग अनावर झाल्याने पोटच्या मुलाने ६५ वर्षीय जन्मदात्या पित्याच्या गुप्तांगावर लाथांनी वार करून बुधवारी सकाळी जखमी केले. त्यानंतर उपचाराअभावी पित्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ७ वाजता आष्टी परिसरातील प्रियदर्शनी येथे घडली. बोंदिका आशन्ना पोरेते असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. आष्टीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या प्रियदर्शनी येथील बोंदिका आशन्ना पोरेते यांना दोन मुले व एक मुलगी आहे. बोंदिका पोरेते यांच्या पत्नीला भावाकडून संपत्तीचा काही हिस्सा प्राप्त झाला होता. परंतु सदर हिस्सा आपल्याला न देता केवळ आपल्या मोठ्या भावाला का दिला जात आहे. हिस्से करताना आपल्याशी दुजाभाव होत असल्याच्या भावनेतून आरोपी शिवराम बोंदिका पोरेते (४५) याने बुधवारी सकाळी वडील बोंदिका पोरेते यांच्या शरीरावर व गुप्तांगावर लाथाबुक्यांनी वार केला. दिवसभर वडिलांना शिवरामने मारझोड केली. त्यामुळे बोंदिका पोरेते यांना अंतर्गत जबर दुखापत झाली. शेवटी वेदना असह्य झाल्याने बोंदिका पोरेते यांचा गुरूवारी सकाळी ७ वाजता घरीच उपचाराअभावी मृत्यू झाला. सदर घटनेची तक्रार गावातच घराशेजारी राहणाऱ्या बोंदिका पोरेते यांच्या ३८ वर्षीय मुलीने आष्टी पोलीस ठाण्यात गुरूवारी दाखल केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून शिवराम पोरेते याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद पोटवार, मिलींद एलावार करीत आहेत.उपचाराअभावी बोंदिका रात्रभर विव्हळलाप्रियदर्शनी येथे बुधवारी बोंदिका पोरेते यांचा लहान मुलगा शिवराम पोरेते याने बोंदिका यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. सदर मारहाण एवढी जबर होती की, बोंदिका दिवसभर विव्हळला तरीही कुटुंबातील कोणत्याच सदस्याने बोंदिकाला उपचारासाठी दवाखान्यात हलविले नाही, अथवा घरी डॉक्टरला बोलाविले नाही. दिवसानंतर रात्रभरही बोंदिका लाथाबुक्यांच्या माराने विव्हळत राहिला. शेवटी गुरूवारी सकाळी ७ वाजता वेदना असह्य झाल्याने बोंदिकाने प्राण सोडला. यापूर्वीही संपत्तीच्या वादातून शिवराम पोरेते हा वडिलांशी वाद घालून त्यांना नेहमीच मारहाण करायचा. परंतु याची कुठेही वाच्यता होत नव्हती