शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्याना हायकोर्टाचा दिलासा

By admin | Updated: August 20, 2015 00:42 IST

मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून विधानसभेवर झालेल्या निवडीस आव्हान देणारी निवडणूक याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून विधानसभेवर झालेल्या निवडीस आव्हान देणारी निवडणूक याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळली.नागपूरच्या पार्वतीनगर येथे राहणारे एक वकील सतीश महादेवराव उके यांनी ही याचिका केली होती. तिच्यामध्ये निश्चित आव्हान मुद्दे स्पष्ट केलेले नसल्याने ती साक्षीपुरावे घेण्याआधीच प्राथमिक स्तरावच फेटाळावी, असा अर्ज फडणवीस यांनी केला होता. न्या. रवी के.देशपांडे यांनी ७४ पानी सविस्तर निकालपत्र देऊन फडणवीस यांचा हा अर्ज मंजूर करत उके यांची याचिका फेटाळली.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास त्याच्याविरुद्ध चाललेल्या व प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र उमेदवारी अर्जासोबत करावे लागते. फडणवीस यांनी गेल्या वर्षी २६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र केले त्यात त्यांनी त्यांच्याविरुद्धच्या दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे त्यांचा असा सदोष अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळायला हवा होता. परंतु तो फेटाळला न गेल्याने निवडणुकीवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी, असे उके यांचे म्हणणे होते. मात्र न्यायालयाने म्हटले की, जेव्हा एखाद्याविरुद्ध पोलीस एफआयआर नोंदवितात तेव्हा त्याची माहिती आरोपीला लगेच कळतेच असे नाही. मात्र ते प्रकरण जेव्हा न्यायालयात जाते किंवा आरोप निश्चित केले जातात तेव्हा मात्र आरोपीला ते माहित असणे अपेक्षित असते. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दोन फौजदारी खटल्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नाही असे उके म्हणतात त्या प्रकरणांची न्यायालायांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी दखल घेतली होती किंवा त्यात आरोप निश्चित केले होते का याची माहिती त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना फडणवीस यांना या दोन प्रकरणांची माहिती असूनही त्यांनी ती दडवली यास पुष्टी देणारी कोणतीही माहिती उके यांनी याचिकेत दिलेली नाही. (प्रतिनिधी)