शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

By admin | Updated: May 23, 2015 01:52 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सहकारी तीन मंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला.

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सहकारी तीन मंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. मात्र हेलिकॉप्टरमधील प्रवाशांची संख्या कमी करण्याबरोबरच त्याची अनेकवार चाचणी घेतल्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापूरकडे सुखरूप रवाना झाले. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दिंडोरी रोडवरील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे शासकीय हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदवीदान समारंभासाठी रवाना झाले. दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी मंत्री कोल्हापुरला जाण्यासाठी दिंडोरी रोडवरील परेड मैदानावरील हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र जमिनीपासून काही फूट उड्डाण केलेले हेलिकॉप्टर अचानक पुन्हा उतरविण्यात आले. त्यामुळे आधी मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक सुमित वानखेडे यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर जलसंपदामंत्री महाजन यांना उतरविल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर ते यशस्वी ठरले.ओझरच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर चालकाशी संपर्क साधून तांत्रिक बिघाडाबाबत माहिती घेतली असता, त्यांनी ‘ओके’ असल्याचा निर्वाळा दिल्यावर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)आधी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर जलसंपदा मंत्री महाजन यांना उतरविल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर ते यशस्वी ठरले.