शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री निघाले परदेश दौ-यावर; समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ उभारणीसाठी होणार करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:05 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ, वांद्रे शासकीय कॉलनी पुनर्विकास, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा औद्योगिक क्लस्टरचा विकास, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प आणि बंदरांच्या विकासासाठी विविध करार

यदु जोशी।मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ, वांद्रे शासकीय कॉलनी पुनर्विकास, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा औद्योगिक क्लस्टरचा विकास, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प आणि बंदरांच्या विकासासाठी विविध करार करण्याकरिता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १८ ते २३ आॅगस्टदरम्यान एका शिष्टमंडळासह परदेश दौºयावर जात आहेत.सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपान या तीन देशांच्या दौºयात राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. यातील बहुतेक करार हे त्या देशांची सरकारे, वित्तीय संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्यात होणार आहेत.पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे, तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाची शासनाची योजना आहे. त्यासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दौºयात दक्षिण कोरिया सरकारच्या कोरियन लँड अँड हाउसिंग कॉर्पोरेशनशी करार होण्याची शक्यता आहे.सोबत शिवसेनेचे शिंदे जाणार-मुख्यमंत्र्यांच्या या दौºयात सार्वजनिक उपक्रममंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे सोबत असतील. समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध असल्याचे चित्र असताना, शिंदे यांनी मात्र हा मार्ग होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.शिष्टमंडळात वरिष्ठ अधिकारी-अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव वल्सा नायर सिंग (नागरी वाहतूक), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी हे मुख्यमंत्र्यांसोबतच्या शिष्टमंडळात असतील.