शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी मुंढेंना परत बोलवावे, महापौरांची मागणी

By admin | Updated: June 29, 2017 03:51 IST

शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेवाढ प्रकरणी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीला पुणे महानगर परिवहन निगमचे (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आलेच नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेवाढ प्रकरणी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीला पुणे महानगर परिवहन निगमचे (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आलेच नाहीत. त्यामुळे संतप्त महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांचा निषेध केला व मुख्यमंत्र्यांकडे त्यांना परत बोलावण्याची मागणी करणार आहे, असे सांगितले.शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेदरात अचानक वाढ केल्याबाबत तोडगा काढण्यासाठी म्हणून महापौरांनी मुंढे यांना बुधवारी बैठकीसाठी पाचारण केले होते. आयुक्त कुणाल कुमार यांनी मुंढे यांच्याशी चर्चा करून ही वेळ ठरवली होती व तसे सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते. मात्र, मुंढे या बैठकीला आलेच नाहीत. त्यांनी आपल्या दोन सहायक अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाठविले. आपण कामकाजामुळे येऊ शकत नाही, असा निरोप पाठविला.त्यामुळे महापौर टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना परत पाठवून दिले. ‘ज्यांना कसलाही अधिकारी नाही, त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही’ असे त्यांनी सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांची यामुळे धावपळ उडाली; मात्र त्यांच्याशीही मुंढे यांचा संपर्क होऊ शकला नाही. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मात्र महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका निश्चित केली व मुंढे यांचा निषेध करण्याचे ठरले.महापौर टिळक यांनी सांगितले, की मुंढे यांचा हा हटवादीपणा आहे. सर्व पदाधिकारी ४० लाख पुणेकरांचे प्रतिनिधित्व करतात. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांनी गंभीर वाटत नसेल, तर त्यांची तपासणीच केली पाहिजे. पीएमपीमध्ये महापालिकेचे ६० टक्के भागभांडवल आहे. दर वर्षी कोट्यवधी रुपयांची मदत केली जाते. तरीही ते असे वागत असतील, तर त्यांची गरज नाही, असे मत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्र्यांकडे भाजपानेच मुंढे यांच्या नियुक्तीची मागणी केली होती, असे लक्षात आणून दिले असता महापौरांनी ‘ते चांगले काम करतील अशी आशा होती,’ असे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या या हटवादीपणामुळे ते कितीही चांगले काम करीत असतील तरीही त्यांचा उपयोग नाही, असे त्या म्हणाल्या. मुंढे यांना परत बोलवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात लवकरच त्यांना पत्र सविस्तर पत्र लिहिणार आहे, असे टिळक यांनी सांगितले.