शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘पगारवाल्या’ भार्इंसाठी ‘बच्चा’ मुख्यमंत्री धावले

By admin | Updated: December 10, 2015 02:55 IST

‘भाई तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती, या शब्दात पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलकी टीका केली होती. भार्इंनी मुख्यमंत्र्यांना बच्चा म्हटले होते.

यदु जोशी,  नागपूर‘भाई तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती, या शब्दात पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलकी टीका केली होती. भार्इंनी मुख्यमंत्र्यांना बच्चा म्हटले होते. तथापि, आगामी विधान परिषद निवडणुकीत ‘पगारवाल्या’ भार्इंसाठी बच्चा मुख्यमंत्री धावून गेले आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुंबईत विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत असून भाजपा-शिवसेना युतीमध्ये एक जागा शिवसेनेला मिळाली असून विद्यमान आमदार असलेले रामदास कदम हेच शिवसेनेचे उमेदवार आहेत. तथापि, दुसऱ्या जागेसाठी भाजपाने उमेदवार दिला नाही तर रामदास कदम यांना कोणताही धोका न होता ते निवडून येतील, असे चित्र होते. तथापि, भाजपाने मनोज कोटक यांना अधिकृतपणे उमेदवारी दिल्याने कदम अस्वस्थ झाले होते. सूत्रांनी सांगितले की ही अस्वस्थता कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर काल घातली. भाजपाचा उमेदवार राहिला तर शिवसेनेला काही दगाफटका होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. भाजपाने उमेदवारच देऊ नये, असा कदम यांचा आग्रह होता. त्यांच्या हट्टानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तथापि, भार्इंना भय नाही, ते नक्कीच जिंकतील पण भाजपाचाही एक उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे अभय मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांचे समाधान झाले आणि शिवसेनेने एक तर भाजपाने एक जागा लढण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना सांगितले की, शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी करण्याचा भाजपाचा कोणताही हेतू नाही. शिवसेनेला स्वत:च्या बळावर कदम यांना निवडून आणण्यात अडचण येणार नाही. भाजपाची मते, शिवसेनेची शिल्लक मते आणि अन्य पक्ष/अपक्षांची मते मिळवून कोटक यांना जिंकविण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर समाधान झाल्याने उद्धव यांनी भाजपाने दुसरी जागा लढविण्यास ‘एनओसी’ दिली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.