शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाला मुख्यमंत्री निधीचा हातभार

By admin | Updated: May 17, 2016 05:59 IST

जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६ जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रूपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला

मुंबई : राज्यातील तीव्र टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६ जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रूपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्याचा लाभ दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या मराठवाडा व विदर्भातील प्रत्येकी सात आणि उर्वरीत महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना मिळणार आहे.दुष्काळ निवारणासाठी राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहभाग दिला होता. हा निधी देण्यामागील जनतेची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारण आणि शेतीसाठी शाश्वत सिंचन निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टंचाईग्रस्त १६ जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दुष्काळ निवारणासाठी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना १० कोटी, लातूर जिल्ह्यासाठी ५ कोटी ९४ लाख आणि १६ जिल्ह्यांसाठी ३२ कोटी असे एकूण ४८ कोटी रु पये मंजूर केले आहेत. त्यातील औरंगाबाद विभागीय आयुक्तांना सर्व १० कोटी, लातूर जिल्ह्यासाठी तीन कोटी आणि १६ जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे १६ कोटी, असे एकूण २९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली आणि विदर्भातील वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला तसेच उर्वरीत महाराष्ट्रातून सोलापूर आणि नंदूरबार जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रूपये मिळणार आहेत. या जिल्ह्यांनी पावसाळ््यापूर्वी निधीचा विनियोग करून जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे.आत्महत्याग्रस्त किंवा टंचाईची सर्वाधिक झळ बसलेल्या एका गावाची निवड संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी संयुक्तपणे करणार असून निवडलेल्या गावाला हा निधी देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाची गरज भागविणाऱ्या प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील ६२०५ गावांमध्ये २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाची १,५५,२७२ कामे पूर्ण झाली असून ३७,९०६ कामे प्रगतीपथावर आहेत. या वर्षात एकूण २२०३.७९ कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. तसेच २०१६-१७ मध्ये शासनाकडून ५,१८२ गावांची निवड करण्यात आली असून त्यासाठी १६०० कोटींची तरतूदही आहे. (विशेष प्रतिनिधी)