शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य माहिती आयुक्तांचीही बाजू उच्च न्यायालय ऐकणार

By admin | Updated: June 7, 2017 05:46 IST

२६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी कॉल रेकॉर्डमध्ये तफावत असल्याने निवृत्त आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांची चौकशी करण्याचा आदेश मुख्य माहिती आयुक्तांनी दिला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी कॉल रेकॉर्डमध्ये तफावत असल्याने निवृत्त आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांची चौकशी करण्याचा आदेश मुख्य माहिती आयुक्तांनी दिला होता. या आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने न्यायालयाने या प्रकरणी आयुक्तांचीही बाजू ऐकणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली आहे.जुलै २०१४मध्ये मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी राज्य सरकारला ‘कमिशन आॅफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट’ अंतर्गत उच्च न्यायालयाच्या निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशांची समिती नियुक्त करून मारिया व अन्य काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा आदेश दिला. या आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे होती. खंडपीठाने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी या याचिकेची माहिती मुख्य आयुक्तांना देण्यास सांगितले.२६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांनी २६/११च्या दिवशी पोलीस कंट्रोल रूममधील सर्व कॉल रेकॉर्ड्सची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवली होती. सुरुवातीला त्यांना माहिती देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे कामटे यांनी मुख्य माहिती आयुक्तांकडे अर्ज केला. मात्र त्यानंतर नोव्हेंबर २००९ आणि फेब्रुवारी २०१० रोजी देण्यात आलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे विनीता यांना आढळले.माहिती उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून कामटे यांना माहिती देण्यास विलंब केला, असे म्हणत मुख्य माहिती आयुक्त गायकवाड यांनी राकेश मारिया यांची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. आयुक्तांना अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्याचा अधिकार नाही. आयुक्त फारतर अधिकाऱ्याला दंड ठोठावू शकतात, असा युक्तिवाद अ‍ॅड. वग्यानी यांनी खंडपीठापुढे केला. निर्णय घेताना आयुक्तांचीही बाजू ऐकली पाहिजे, असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १५ जून रोजी ठेवली.