शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांच्या मोर्चासाठी सरसावले छत्रपती घराणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 20:11 IST

महाराष्ट्रात सर्वत्र निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चात समाज बांधव नेत्यांविना एकत्र येत आहेत.

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 6 - महाराष्ट्रात सर्वत्र निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चात समाज बांधव नेत्यांविना एकत्र येत आहेत. मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साता-यातही हा मोर्चा काढण्यासाठी युध्दपातळीवर नियोजन सुरु झालेले असतानाच खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या छत्रपती घराण्याच्या वंशजांनीही मोर्चात सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय केला आहे. दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांनी जाहीर पत्रक काढले असून या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील महिलांनाही त्यांनी आवाहन केले आहे. राज्यभर मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सातारच्या छत्रपती घराण्याने पुढाकार घेतला असल्याने आगामी मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. साता-यामध्ये भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनासाठी तालुकावार बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. फलटण येथे बुधवारी (दि. ६) मोर्चाच्या नियोजनाची बैठक घेण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी साता-यात नियोजनाची बैठक घेण्यात येईल, अशाच पध्दतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात नियोजनाच्या बैठका घेण्यात येतील, त्यानंतर मुख्य मोर्चाचा दिवस व तारीख ठरवून सातारा येथे भव्य मोर्चा काढला जाणार आहे. (प्रतिनिधी)