शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांच्या अडचणीत आणखी वाढ

By admin | Updated: April 2, 2017 14:47 IST

मुंबईसह १६ राज्यांतील ३०० हून अधिक ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे टाकले. यात मुंबईच्या अंधेरीतील एका सनदी लेखापलाकडे

मुंबई : मुंबईसह १६ राज्यांतील ३०० हून अधिक ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे टाकले. यात मुंबईच्या अंधेरीतील एका सनदी लेखापलाकडे (सीए) टाकलेल्या छाप्यात माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी ४६.७ कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या तुरुंगात असलेल्या भुजबळांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीच्या पथकाने अंधेरीतील जगदीश नावाच्या ‘सीए’च्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यातून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. काही कंपनीचालकांसह २० बोगस संचालकांची नावेही उघड झाली आहेत. या कारवाईदरम्यान बोगस कंपन्यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी तब्बल ४६.७ कोटींचा काळा पैसा पांढरा केल्याचे ईडीच्या पथकाला आढळून आले. हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांचा वापर करण्यात आल्याचे आढळले असून, आता या सर्व कंपन्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये एकाच वेळी छापे मारत, काळ्याचा पांढरा पैसा करणाऱ्या बोगस कंपन्यांभोवती कारवाईचा फास आवळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे ३०० कंपन्या ईडीच्या रडारवर आहेत. या कंपन्यांनी शंभर कोटींहून अधिक काळा पैसा पांढरा केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. ईडीचे अधिकारी कंपन्यांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करत आहेत. सुरुवातीला या कंपन्यांची प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतरच ईडीने कारवाईचे पुढील पाऊल उचलले आहे. काळे धन पांढरे करण्यासाठी कर्ज देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचे दिसून आले आहे. त्यात राजकीय नेते, उद्योजक यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)