शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चेकमेट दरोडा : नाशिक येथून एक कोटी जप्त; आरोपींच्या कोठडीत १३ जुलैपर्यंत वाढ

By admin | Updated: July 11, 2016 05:34 IST

‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.’ या खासगी वित्त कंपनीवरील दरोड्यातील किरण साळुंखे या एकाच आरोपीच्या नाशिक येथील

जितेेंद्र कालेकर,  ठाणे‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.’ या खासगी वित्त कंपनीवरील दरोड्यातील किरण साळुंखे या एकाच आरोपीच्या नाशिक येथील एका नातेवाईकाच्या घरातून एक कोटी पाच लाख ५० हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी नऊ कोटी ५३ लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. दरम्यान, ठाणे न्यायालयाने यातील नऊ आरोपींच्या कोठडीत १३ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.मिळाले कोटींचे घबाडनाशिकच्या वणी परिसरात दरोड्याचा बनाव करणाऱ्या किरण साळुंखे याच्या नाशिक येथील घरातून एक कोटी पाच लाख रुपये शनिवारी हस्तगत केले. रुग्णालयातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आपण त्या गावचेच नसल्याचा आव त्याने आणला होता. त्याच्याकडे मिळालेल्या या रकमेमुळे हस्तगत झालेली रोकड आता नऊ कोटी ५३ लाखांच्या घरात गेली आहे. पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या पथकाने वेगवेगळ्या आरोपींच्या घरांतून, तसेच अन्य काही ठिकाणांहून आठ कोटी ४८ लाखांच्या घरात रोकड हस्तगत केली होती. दरोडा पडला, त्या वेळी एकूण नऊ कोटी १६ लाख रुपये लुटले गेल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, या रकमेपेक्षा जास्त रक्कम लुटली गेल्याची शक्यता व्यक्त करणारे वृत्त ‘लोकमत’ ने १० जुलै रोजी दिले होते, ते खरे ठरले.अर्थात, त्या वेळी काही पावत्या टॅली न झाल्यामुळे नेमकी किती रोकड गेली, हे कंपनी व्यवस्थापनाकडून कळू न शकल्यामुळे, नऊ कोटी १६ लाखांचा आकडा प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) दिला होता, असे पोलिसांनी सांगितले. नाहीतर मी डोक्यात दगड घालेनज्या किरण साळुंखे याच्याकडे एक कोटी रुपये मिळाले, त्यानेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हरी वाघ आणि भास्कर शिंदे यांना लुटीचा बनाव रचण्यास सांगितले. त्या वेळी ‘माझ्या पायावर दगडाने मारहाण कर. अन्यथा, मी तुमच्या डोक्यात दगड घालीन,’ अशी धमकीही त्याने भास्करला दिली. त्याने सांगितल्याप्रमाणे भास्करने त्याच्या पायावर दगड घातले आणि तो पसार झाला. जखमी किरणच्या पायावरील उपचार झाल्यानंतर त्यालाही ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मोठी रक्कम मिळाली. या दरोड्यातील अमोल कर्ले, आकाश चव्हाण, उमेश वाघ, दिनेश आव्हाड, मयूर कदम, हरिश्चंद्र मते, नवनाथ चव्हाण, पांडुरंग चव्हाण आणि योगेश चव्हाण या आरोपींना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्याकडून आणखी रोकड मिळण्याची शक्यता असून, आणखी एका फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. सर्वांच्या कोठडीत १३ जुलैपर्यंत वाढ करण्याची मागणी गुन्हे अन्वेषण विभागाने ठाणे न्यायालयाकडे केली.