शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंगपरीक्षणासाठी जाच; गरोदर विवाहितेची दोन मुलींसह आत्महत्या

By admin | Updated: July 21, 2016 20:11 IST

दोन मुलीनंतर तिसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या रेखा भागवत सानप (२५) या विवाहितेस गर्भलिंग परीक्षणासाठी सासरच्यांनी छळ केला.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. २१ : दोन मुलीनंतर तिसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या रेखा भागवत सानप (२५) या विवाहितेस गर्भलिंग परीक्षणासाठी सासरच्यांनी छळ केला. या छळाला कंटाळून तिने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना पाटोदा तालुक्यातील घुलेवाडी येथे गुरुवारी उघडकीस आली असून खळबळ उडाली आहे.

पिंकी भागवत घुले (४), राधिका भागवत घुले (२) अशी त्या दुर्दैवी मुलींची नावे आहेत. दोन दिवसांपासून ती मुलींसह बेपत्ता होती. शेतात जाते असे सांगून ती घराबाहेर पडली . मात्र, परतलीच नाही. त्यामुळे सासरचे तिचा शोध घेत होते.  ती बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली नव्हती. माहेरच्यांना कळविले होते. गुरुवारी सकाळी स्वत:च्याच शेतातील विहिरीत तिघी मायलेकींचे मृतदेह तिचा पती  भागवत याला आढळून आले. आष्टी तालुक्यातील मातावळी हे रेखाचे माहेर आहे. सहा वर्षांपूर्वी तिचा विवाह  भागवत सानपसोबत झाला होता.  

लग्नानंतर त्यांना पिंकी व राधिका या दोन मुली झाल्या. तिसऱ्यांदा रेखा गरोदर होती. तिला चार महिने झाले होते.  अगोदरच्या दोन्ही मुलीच असल्याने गर्भिचकित्सा करण्यासाठी सासरच्या लोकांनी लकडा लावला होता .  मात्र,  रेखाचा निदान करण्यास विरोध होता. त्यामुळे तिचा जाच आणखीच वाढला होता. शिवाय ट्रक्टरचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ होत असल्याने ती वैतागली होती. यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. उपअधीक्षक डॉ अभिजीत पाटील , निरीक्षक आदीनाथ रायकर , सहाय्यक निरीक्षक एस.एम. राठोड हे घटनास्थळी तळ ठोकून होते .

रावसाहेब लक्ष्मण बांगर यांच्या फिर्यादीवरुन पती भागवत सोमीनाथ घुले , सासरा सोमीनाथ मल्हारी घुले, सासू आशा सोमीनाथ घुले , नणंद निर्गुणा सोमीनाथ घुले यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पाटोदा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.  यापैकी भागवत व सोमीनाथ या दोघांना अटक केली आहे. मयत रेखाविरुद्धही मुलीच्या खूनप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. सासरकडील मंडळीकडून तोडफोडरेखाच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांना अटक करेपर्यंत मृतदेह विहिरीबाहेर काढण्यास विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातवरण निर्माण झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर माहेरकडील मंडळींनी मृतदेह बाहेर काढण्यास तयार झाले. गावातील घरी सासरच्या मंडळींना तोडफोड केली. एकाच चितेवर अंत्यसंस्कार पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात तिन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर दुपारी चार वाजता मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. घुलेवाडी येथे सायंकाळी दोन मुलींसह रेखा यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी हुदंके व आक्रोशामुळे परिसर सून्न झाला होता. गावात रात्री उशिरापर्यंत एकही चूल पेटली नाही.