शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

स्वस्त घरकुलासाठी मालमत्ताकरही स्वस्त

By admin | Updated: May 21, 2016 01:38 IST

जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या स्वस्त घरकुल योजनेतील रहिवाशांना मालमत्ताकरात सवलत मिळणार आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या स्वस्त घरकुल योजनेतील रहिवाशांना मालमत्ताकरात सवलत मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. स्वस्त घरकुल प्रकल्पातील रहिवाशांना महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामार्फत या सदनिकाधारकांना मालमत्ताकराची बिले देण्यात आली आहेत. मात्र, शहरातील विविध संघटनांनी या प्रकल्पातील मालमत्तांना कर आकारू नये अथवा सवलत द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार विशेष विकास प्रकल्पांच्या इमारतीच्या आणि जमिनींच्या बाबतीत राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे वेळोवेळी निश्चित केलेल्या किंवा कमी केलेल्या दराने मालमत्ताकर आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार स्थायी समिती सभा व महापालिका सभा यांनी ठराव करून त्यास शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार या प्रकल्पातील निवासी घरांना सवलतीच्या दरात मालमत्ताकर आकारणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार पहिल्या वर्षापासून दहाव्या वर्षापर्यंत वसूल करण्यात आलेल्या मालमत्ताकराच्या दराच्या २० टक्के सूट देण्यात येणार आहे. ११ वर्षांपासून १५व्या वर्षापर्यंत मालमत्ताकराच्या ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)>हा प्रस्ताव सादर करताना त्यामध्ये करसवलत मिळावी यासाठी मागणी केलेल्या विविध संघटनांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर आक्षेप घेत सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या की, प्रस्ताव तयार करताना कोणत्याही संघटनांचे नाव यायला नको, त्याचे भांडवल केले जाते. तसेच शासनाकडे केवळ प्रस्ताव पाठविले जातात. मात्र, त्यांचा पाठपुरावाही व्हायला हवा, असेही नगरसेवकांनी म्हणाले.