शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खुर्ची, टेबल, प्रसाधनगृहाचे शिक्षकांकडून भाडे वसूल

By admin | Updated: October 6, 2014 05:19 IST

साकीनाका येथील शिवनेर विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षकांंकडून कोणतीही वस्तू वापरल्यास त्यासाठी वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे

मुंबई : साकीनाका येथील शिवनेर विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षकांंकडून कोणतीही वस्तू वापरल्यास त्यासाठी वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थाचालकाने खुर्ची, टेबल, मुतारी, प्रसानगृहाच्या वापरासाठी शिक्षकांकडून पैसे वसुलीसाठी एका शिपायाची नेमणूक केली असून, यासाठी उपमुख्याध्यापिकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. शिवनेर विद्यामंदिर हायस्कूल बंद करण्यासाठी संस्थाचालकांने यापूर्वी अनेक प्रकारच्या बळाचा वापर केला आहे. याविरोधात शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. संस्थाचालकाकडून शाळा अडचणीत असल्याचे कारण पुढे करीत शिक्षकांकडून वसुली करीत असल्याचा आरोप शिक्षकाकडून होत आहे. याबाबत बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालयात सुनावणीही झाली होती. यावर शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाने शाळेला पत्र पाठविले असून, शाळेने तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.शाळेतील शिक्षकांनी खुर्चीचा वापर केल्यास त्यासाठी पाच रुपये, टेबलसाठी दहा रुपये, मुतारीसाठी २ रुपये व प्रसाधनगृहासाठी पाच रुपये वसूल करण्यात येत आहेत. तसेच एका उपमुख्याध्यापिकेचाही यामध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शाळेतील उपमुख्याध्यापक महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवा शर्ती) नियमवली- १९८१ मधील नियम ४ नुसार जबाबदारी पार पाडत नसून, यामुळे नियमांचे उल्लंघनही केले जात असल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)