शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

वसंतदादा बँक घोटाळाप्रकरणी ४० जणांवर आरोपपत्र

By admin | Updated: August 9, 2016 15:06 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी ४० जणांवर मंगळवारी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. ९ -  अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर मंगळवारी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले. संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून आरोपांवरील म्हणणे मांडण्यासाठी २५ आॅगस्टरोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. माजी संचालकांमध्ये जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश आहे.   
सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाºया या बँकेतील तत्कालिन संचालक, अधिकाºयांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर केले. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्जप्रकरणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखाच्या रकमेबाबत आता आरोप ठेवण्यात आले आहेत. ३४ माजी संचालक व ७३ कर्मचाºयांची चौकशी होणार होती. मात्र चौकशीपूर्वी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पाच वर्षांपेक्षा जुन्या प्रकरणांना वगळण्यात आले. परिणामी चौकशीतून चार माजी संचालकांना वगळण्यात आले. निर्णय प्रक्रियेत नसलेल्या ७३ पैकी ६९ कर्मचाºयांना चौकशी अधिकाºयांनी तर दोन वरिष्ठ अधिकाºयांना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वगळले आहे. कर्मचाºयांपैकी आता केवळ दोनच अधिकाºयांवर आरोप ठेवले आहेत.  
निष्कर्षांमध्ये चौकशी अधिकाºयांनी म्हटले आहे की, माजी संचालकांनी संस्थेच्या हितापेक्षा हितसंबंध जोपासण्यावर भर दिला. तज्ज्ञ संचालक असलेल्या चौघांनी स्वत:च्या नावे प्रतिज्ञापत्र तयार करून कर्जवाटपाच्या बैठकीस उपस्थिती दर्शविली. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर संस्थेच्या नव्हे, तर संबंधितांच्या हितासाठी केला. आरोप ठेवण्यात आलेले तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक भूपाल दत्तात्रय चव्हाण आणि कर्जविभागप्रमुख प्रकाश बापूराव साठे या दोघांनी त्यांच्या अधिकाराचा वापर संस्थेच्या हितासाठी करणे आवश्यक होते. चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप होत असल्याचे माहिती असूनही त्यांनी यात सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे ते या प्रकरणांना जबाबदार आहेत. 
नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाºयांचा समावेश होता. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. माजी संचालकांपैकी चारजणांना चौकशीतून वगळले आहे. उर्वरित ३0 माजी संचालकांपैकी माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते मदन पाटील यांच्यासह तिघांचे निधन झाले आहे. त्यामुळे तिघांच्या ११ वारसदारांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.