शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम निबंधक कार्यालयाला ‘धडा’

By admin | Updated: November 10, 2014 04:12 IST

जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरप्रकार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार

पारनेर (जि. अहमदनगर) : जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरप्रकार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील बैठकीत सांगितले़राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू केलेली नागरिकांची सनद घराघरांत पोहोचविणार असल्याचे हजारे म्हणाले़ अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीच्या राज्यातील कार्यकर्त्यांचे तीन दिवसीय अभ्यास मार्गदर्शन शिबिर राळेगणसिद्धीत सुरू आहे़रविवारी शिबिरात मार्गदर्शन करताना हजारे म्हणाले की, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी नागरिकांची सनद तयार करून राज्यात एका नव्या आदर्श कारभाराचे उदाहरण ठेवले आहे. राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन-खरेदी विक्रीचे व्यवहार होताना होणाऱ्या गैरप्रकारांना या सनदेमुळे आळा बसणार आहे. अर्थात यासाठी आता भष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांची सनद घराघरांत पोहोचवावी लागणार आहे. याची व्यवस्थित अंमलबजवणी होण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. सर्व जण कार्यकर्ते म्हणूनच कार्यरत राहतील. आम्हीसुद्धा कधीही पदासाठी काम केले नाही़ आपण जनतेची सेवा करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)