शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळून छकुली ठार

By admin | Updated: September 3, 2014 02:53 IST

नागाव- गायत्रीनगर भागात मुसळधार पावसाने दरड कोसळल्याने डोंगरावर बांधलेली घरे खचल्याने सात घरांचे नुकसान झाले असून यात एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला

भिवंडी :  शहरातील नागाव- गायत्रीनगर भागात मुसळधार पावसाने दरड कोसळल्याने डोंगरावर बांधलेली घरे खचल्याने सात घरांचे नुकसान झाले असून यात एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला असून इतर 9जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने डोंगरावर राहाणा:या कुटुंबांमध्ये घबराट पसरलेली आहे.
मंगळवारी दुपारी 3 वाजता झालेल्या या दुर्घटनेत सात घरांचे नुकसान झाले असून सृष्टी प्रशांत इनामके ही आठ वषार्ंची मुलगी जागीच मृत्यू पावली. तर सत्तार शहानूर पठाण (46), रामभवन मंगरू मौर्या (18), सुनीत रामजल मौर्या (18), पूजा घनश्याम यादव (13), कल्पना प्रशांत इनामके (28), राजकुमारी घनश्याम यादव (35), अशोककुमार श्रीराम गौतम (21), किरणदेवी रामदेव गौतम (35), शांतीदेवी रामदेव गौतम (2) असे 9 जण जखमी असून त्यांच्यावर स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
गायत्रीनगरमध्ये वसलेल्या सर्व झोपडय़ा व पक्की घरे वन खात्याच्या जागेवर असून शहरांत अशा सर्व अवैध झोपडपट्टींची वसाहत नगरसेवकांनी आपल्या मतांसाठी वसवलेली आहे. त्यामुळे या अवैध व धोकादायक वसाहतींवर पालिका प्रशासन कारवाई करीत नाही. मात्र अशा अपघातांना शासन व प्रशासनाच्या अधिका:यांना सामोरे जावे लागते. या घटनेमुळे डोंगरावर वसलेल्या वसाहतीत घबराट पसरली असून, नुकत्याच घडलेल्या माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल की काय, असा धसका येथील नागरिकांनी घेतला आहे. घटनास्थळी पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. (प्रतिनिधी)