शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आडनाव बदलल्याने जात बदलत नाही

By admin | Updated: May 29, 2016 18:02 IST

एखाद्या व्यक्तीने त्याचे आजनाव बदलले तरी त्यामुळे त्याची जन्मापासून असलेली जात बदलत नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने एका उमेदवाराचा पदव्युत्तर प्रवेशासाठी विचार

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २९ : एखाद्या व्यक्तीने त्याचे आजनाव बदलले तरी त्यामुळे त्याची जन्मापासून असलेली जात बदलत नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने बदललेल्या आडनावाने अर्ज केलेल्या एका उमेदवाराचा पदव्युत्तर प्रवेशासाठी विचार करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.शंतनु हरी भारव्दाज या एमबीबीएस डॉक्टरने केलेल्या रिट याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या सुटीकालीन खंडपीठाने असा आदेश दिला की, याचिकाकर्त्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र व आडनाव बदलालंबंधीची सरकारी राजपत्रातील अधिसूचना असेल तर त्याने राखीव कोट्यातून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी केलेल्या अर्जाचा विचार केला जावा.याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. पी. ए. पोळ यांनी न्यायालयास सांगितले की, भारव्दाज यांच्याकडे अनुसूचित जमातीचा वैध जात पडताळणी दाखला असूनही केवळ त्यांनी आडनाव बदलले आहे म्हणून त्यांना राखीव कोट्यातून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश नाकारला जात आहे. यावर खंडपीठाने असे नमूद केले की, आडनाव बदलल्याने कोणाची मूळ जात बदलत नाही. आपल्या आडनावातील बदल राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात आला आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत त्यांना राखीव कोट्यातून अर्ज करण्यास नकार दिला जाऊ शकत नाही.