शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानपला फाशी

By admin | Updated: October 30, 2015 12:35 IST

इंजिनिअर इस्थर अनुह्या हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - इंजिनिअर इस्थर अनुह्या हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल सुनावला.  सानप विरोधात बलात्कार, खून यांसारखे गंभीर आरोप पोलिसांनी लावले होते. जानेवारी २०१४ मध्ये चंद्रभानने इस्थवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून नंतर तिचा खून केला होता. 
मूळची आंध्र प्रदेशमधील असलेली इस्थर मुंबईत एका कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होती. नाताळासाठी आंध्रप्रदेशातील आपल्या गावी गेलेली इस्थर सुट्टी संपल्यानंतर पाच जानेवारी २०१४ रोजी रेल्वेने ती मुंबईत परत आली. पहाटेच्या सुमारास कुर्ला टर्मिनस येथे उतरलेल्या इस्थरचा काहीच पत्ता लागत नव्हता. तब्बल दहा दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुप दरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चंद्रभानला अटक केली. 
कुर्ला स्थानकात एकट्या असलेल्या इस्थरला चंद्रभान सानपने गाठले आणि आपण टॅक्सी चालक असल्याचे सांगत घरी  सोडण्याचे आश्सावन दिले. मात्र त्यावेळेस त्याच्याकडे टॅक्सी नसल्यानं त्यानं दुचाकीवरुन घरी सोडण्याच इस्थरला आश्वासन दिलं. ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाल्यावर त्याने एका निर्जन स्थळी गाडी थांबवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मात्र इस्थरने त्याला विरोध करताच त्याने तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह भांडूप जवळच्या झाडाझुडपांत टाकून दिला.