शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

सवलतींच्या नावाखाली ठेंगा!

By admin | Updated: November 15, 2015 02:27 IST

राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती दिला भोपळा’ या धाटणीचा असल्याची टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष

मुंबई : राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती दिला भोपळा’ या धाटणीचा असल्याची टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे. प्रति युनिट २२६ पैसे हा सवलतीचा वीजदर सर्वांना समान करण्याचा निर्णय राज्य शासनाने अलीकडेच घेतला. त्याचबरोबर इंधन समायोजन आकारात असलेली ५० टक्के सवलत २२ पैसे वा ३० पैसे प्रति युनिट ही रद्द करण्यात आली. त्याचबरोबर महावितरणने केवळ यंत्रमागांसाठी मोठा इंधन समायोजन आकार लागू केला आहे. होगाडे यांच्या म्हणण्यानुसार, याचा परिणाम म्हणून, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या किमान तीन महिन्यांची एकूण बिले २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागासाठी ४ रुपये २२ पैसे प्रति युनिट व त्यावरील यंत्रमागासाठी ४ रुपये ५८ पैसे प्रति युनिट या प्रमाणे येणार आहेत.२६ जून २०१५ रोजी एमईआरसीच्या नवीन आदेशानुसार वाढीव आकार लागू झाला. त्यामुळे २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांचा वीजदर २ रुपये ९४ पैसे युनिट झाला व त्यावरील ग्राहकांचा दर २ रुपये ५७ पैसे प्रति युनिट हाच राहिला. ७ नोव्हेंबरच्या नवीन शासन निर्णयाद्वारे यंत्रमाग धारकांना, १ आॅगस्ट २०१२ पासून लागू केलेली इंधन समायोजन आकारातील ५० टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे. ही सवलत २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागांसाठी कमाल २२ पैसे प्रति युनिट, त्यावरील ग्राहकांसाठी कमाल ३० पैसे प्रति युनिट झाली. (विशेष प्रतिनिधी)