शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुले चोरणाऱ्या टोळीचे मुंबई पोलिसांसमोर आव्हान

By admin | Updated: May 2, 2016 00:08 IST

नागपाड्यातून बेपत्ता झालेल्या तीन मुलांपैकी दोघींची वाराणसीतून सुटका झाली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून यामागे मुल चोरणारी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक

- मनीषा म्हात्रे,  मुंबईनागपाड्यातून बेपत्ता झालेल्या तीन मुलांपैकी दोघींची वाराणसीतून सुटका झाली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून यामागे मुल चोरणारी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या टोळीकडे यातील आणखी एक ४ वर्षीय गुलफाम ताब्यात आहे. त्यामुळे या टोळीचे रॅकेट उध्वस्त करत गुलफामची सुखरुप सुटका करणे पोलिसांसमोर आवाहन बनले आहे.नागपाडा नयानगर येथून २४ एप्रिल रोजी अचानक गायब झालेल्या तरन्नुम कासुल (६), कुलसूम जुबेर खान (६) आणि गुलफाम कासुल(४) या चिमुकल्यांमुळे मुंबई हळहळली. सहा दिवसानंतर यातील दोघी वाराणसीत सापडल्याची माहिती मिळताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारी दोन्ही मुलींना ताब्यात घेत नागपाडा पोलीसांसह त्यांचे नातेवाईक मुंबईच्या दिशेने निघाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत या दोघींही त्यांच्या घरी पोहचणार आहेत.या प्रवासादरम्यान या चिमुकल्यांनी आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. २४ एप्रिल रोजी खेळत असताना दोन महिलांनी त्यांना चॉकलेट आणि आईस्क्रिमचे अमिष दाखवून जवळ बोलावले. त्यानंतर रस्ता ओलांडत असताना एका टॅक्सीमधून या चिमुकल्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना आणखी खाऊ देण्याचे अमिष दाखवून मुंबईतल्याएका खोलीत डांबून ठेवले. दोन दिवस उपाशीपोटी असलेल्या या चिमुकल्यांना दोघी महिला आणि पुरुषाकडून मारहाण होत होती. त्यात रडल्यास ठार मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे हे चिमुकले आणखीनच धास्तावले होते. आंटी हमे घर जाना है... हमे छोड दो... चिमुकल्यांकडून होत असलेल्या आकांताकडेही तिघेही दुर्लक्ष करत होते. अशी माहिती मुलीने सांगितल्याचे कुलसुमचे वडील जुबेर खान लोकमतशी बोलताना दिली.दोन दिवस खोलीत डांबून ठेवल्यानंतर २६एप्रिल रोजी या तिघांना टे्रनने बनारस येथे नेण्यात आले. तेव्हा या टोळीतील दोन महिला आणि पुरुष त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुलांसोबत वाराणसीत पोहचले. मात्र त्यावेळेस तिघांनीही आरोपींसोबत जाण्यास नकार देत रडून रडून गोंधळ घातला. नागरीक जमताहेत हे पाहून तिघेही जण ४ वर्षीय गुलफामला घेऊन तेथून निसटले. तेथे धडकलेल्या पोलिसांमुळे मुलींची यातून सुटका झाली. वाराणसीमध्ये या मुलांचा सौदा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या तावडीतून पोलीस गुलफामची सुटका कशी करतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या टोळीच्या अटकेतून खुप मोठे रॅकेट उध्वस्त होण्याची शक्यता आहे. तुम घर जाओ हम आते है....व्हायएमसी मैदानाच्या दिशेने निघतेवेळी कुलसुमचा ४ वर्षीय भाऊ अकबरअलीही तिच्या मागे लागला होता. मात्र तुम घर जाऊ हम आते है... असे सांगून तिने त्याला घरी धाडल्याची माहिती कुलसुमची आई नाजनीने दिली. त्यामुळे तो तरी यातून बचावल्याचे खान कुटुंबियांचे म्हणणे आहे. कुर्ल्यात डांबून ठेवल्याची शक्यता मंगळवारी रात्री कुर्ला येथून एका इसमाने फोन करुन तिघे मुले कुर्ला एलबीएस येथे दिसल्याची माहिती दिली. त्यानुसार तपास पथकाने सकाळपासून कुर्ला परीसर पिंजून काढला. दरम्यान त्यांची काहीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे या तिघांना कुर्ला येथील खोलीत डांबून ठेवल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.