शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आव्हान जलस्रोत टिकविण्याचे

By admin | Updated: October 5, 2016 05:36 IST

येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल

पुणे : येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल. सध्या अस्तित्वात असलेले जलस्रोत टिकविणे आव्हानात्मक असणार आहे. हे जलस्रोत शाश्वत करण्यासाठी नवीन व्यवस्थापन धोरण अवलंबण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मंगळवारी येथे केले.खडकवासला येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवनमंत्री उमा भारती, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलियान, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय जलस्रोत विभागाचे विशेष कार्याधिकारी डॉ. अमरजित सिंग, मुख्य पोस्टमास्टर जनरल एस. सी. अग्रवाल, संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. के. सिन्हा व्यासपीठावर उपस्थित होते. टपाल विभागाने ‘सीडब्ल्यूपीआरएस’वर काढलेले तिकीट, तसेच संस्थेवरील कॉफी टेबल बुक आणि सरदार सरोवर प्रकल्पावरील संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. देशाला विविध घटकांमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगून अन्सारी म्हणाले की, ‘पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करण्याचे आव्हान आहे. अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांच्या तुलनेत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, शहरी जलपुनर्प्रक्रियेतील अल्प गुंतवणूक आणि भूगर्भातील पाण्याचा होत असलेला बेसुमार उपसा, यामुळे पाणीप्रश्न निर्माण होऊ लागला आहे. देशातील अनेक नद्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यासाठी जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्याचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवत जलसंचय, जलसिंचन, ऊर्जा निर्मिती करता येईल, अशा प्रकारच्या धरणांची रचना तयार करण्याचे आव्हान असल्याचे उमा भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)