शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीला रोखण्याचे विरोधी पक्षांना आव्हान

By admin | Updated: November 19, 2016 03:06 IST

राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा नगरपरिषदेची निवडणूक राजकीय नेत्यांच्या उत्सुकतेबरोबरच ‘तटकरे’या राजकीय घराण्याच्या प्रतिष्ठेची बनली आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांचा राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा नगरपरिषदेची निवडणूक राजकीय नेत्यांच्या उत्सुकतेबरोबरच ‘तटकरे’या राजकीय घराण्याच्या प्रतिष्ठेची बनली आहे. आ. सुनील तटकरे यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे आ. अनिल तटकरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचेच श्रीवर्धनचे आ. अवधूत तटकरे यांचे कनिष्ठ बंधू संदीप अनिल तटकरे यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी रोहा नगरपरिषद यावर्षी ‘राजकीय भाऊबंदकी आणि काका-पुतण्यांचे राजकीय द्वंद’याने गाजणार हे स्पष्ट झाले.पुतण्यानेच घरातील निष्ठा झुगारून शिवसेनेतून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणे हे रोहेकर मतदारांना आश्चर्यांचे वाटत आहे. मात्र, त्याच वेळी तटकरे राजकीय घराण्यातील संदीप अनिल तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणे, हे शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री अंनत गिते यांचे यश म्हणायचे की तटकरे यांची सत्ताधाऱ्यांबरोबर जाण्याकरिताची कुशल राजकीय खेळी म्हणायची याचे उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. संदीप तटकरे यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने निष्ठावंत शिवसैनिकांना मात्र हा निर्णय काहीसा रुचलेला नाही; परंतु पक्ष शिस्त म्हणून ते याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत. आ.सुनील तटकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व रोहा नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे यांनाच थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी पुन्हा मिळणार, असे राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि शेडगे यांचे समर्थक असतानाच, रोह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-काँग्रेस या आघाडीचे थेट नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपले व्याही संतोष पोटफोडे यांची उमेदवारी आ.सुनील तटकरे यांनी जाहीर केली आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांना मोठा धक्काच बसला आणि अखेर विद्यमान नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे आपल्या निष्ठावंतांच्या पाठबळावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले.शिवसेना-भाजपाच्या युतीचे सुत रोह्यात जमले नाही. भाजपा उमेदवार निवड समितीच्या अहवालांती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी रोह्यात भाजपाचे थेट नगराध्यक्षपदाचे थेट उमेदवार म्हणून मोतिलाल जैन यांची उमदेवारी जाहीर केली. या उमेदवारीतून रोह्यात भाजपा पक्ष अस्तित्व सिद्ध करून भाजपाची राजकीय प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याची संधी येथे घेतली आहे; परंतु त्याचे यशापयश निवडणुकीच्या निकालांतीच स्पष्ट होणार आहे. रोह्याचे माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह हे अपक्ष उमेदवार, तर बहुजन मुक्ती पार्टीचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल गजगे नगराध्यक्षपदाकरिता रिंगणात आहेत. >प्रचार खुला की छुपा : रोहा नगराध्यक्षपदाकरिता खरी लढत आघाडीचे संतोष पोटफोडे, अपक्ष समीर शेडगे, शिवसेनेचे संदीप अनिल तटकरे अशी तिरंगीच होणार असे जाणकारांचे मत आहे; परंतु त्याच वेळी आ. सुनील तटकरे यांचे बंधू राष्ट्रवादीचे आ.अनिल तटकरे आणि पुतणे राष्ट्रवादीचेच श्रीवर्धनचे आ. अवधूत तटकरे हे आ.सुनील तटकरे यांच्याविरोधात उघडपणे आणि शिवसेना उमेदवार समीर तटकरे यांच्या समर्थनार्थ उघडपणे प्रचार करू शकणार नाहीत.