शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला

By admin | Updated: June 10, 2016 20:06 IST

एकतर्फी प्रेमातुन 19 वर्षीय तरुणीवर चाकुहल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील शिंदे गावी घडल्याने सर्वत्र खळबळ ऊडाली आहे. यामध्ये गंभीर जखमी तरुणीस पुढील

ऑनलाइन लोकमत
पेठ. दि. १० - एकतर्फी प्रेमातुन  19 वर्षीय तरुणीवर चाकुहल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील शिंदे गावी घडल्याने सर्वत्र खळबळ ऊडाली आहे. यामध्ये  गंभीर जखमी तरुणीस पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
   तालुक्यातील शिंदे गावातील तरुणी आपल्या चुलती समवेत आपल्या आजोबांना जेवण घेऊन सकाळी 8 वाजता शेतात गेली, शेतातील कामे अटोपुन दहा वाजेच्या सुमारास शेतातून घराकडे बाळु गाढवे यांच्या शेतातील पायवाटेने परत येत असतांना संशयीत रमेश राघो चारोस्कर (रा. शिंदे, ता. पेठ) याने तरुणीचा रस्ता अडवुन तरुणीसोबत असणा-या चुलतीस ढकलुन दिले व तरुणीचा उजवा हात धरुन " तु माझ्याशी प्रेमसबंध ठेव नाहीतर तुला मारुन टाकेल "  असे धमकावत आपल्या हातातील लोखंडी धारधार शस्राने वार केला व  विरुध्द दिशेला ओढत नेऊन अश्लील वर्तन केले. तसेच,  शिविगाळ करायला लागला. या घटनेने भेदरलेल्या चुलतीने आरडाओरड केल्याने बाजुच्या शेतातील पांडुरंग चारोस्कर व महेंन्द्र चारोस्कर हे धावत आले. त्यांनी तरुणीची सुटका केल्यानंतर तरुणीस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची खबर मिळताच पोलीस ठाण्यात संशयित रमेश राघो चारोस्कर यांच्याविरुध्द  गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे व सहकारी करत  आहेत. संशयित फरार झाल्याने  पेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.