शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चित्रीकरणातून मध्य रेल्वेला १.२३ कोटींची कमाई

By admin | Updated: April 23, 2015 05:31 IST

चित्रपट, जाहिराती आणि माहितीपटांचे मोठ्या प्रमाणात स्थानकांवर चित्रीकरण होत असून, २0१४-१५ मध्ये यातून १ कोटी २३ लाख ५ हजार ६६६ रुपयांची

मुंबई : चित्रपट, जाहिराती आणि माहितीपटांचे मोठ्या प्रमाणात स्थानकांवर चित्रीकरण होत असून, २0१४-१५ मध्ये यातून १ कोटी २३ लाख ५ हजार ६६६ रुपयांची कमाई मध्य रेल्वेने केली आहे. यामध्ये तर बीबीसीकडून ‘मुंबई रेल्वे’ या माहितीपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, बीबीसीकडूनच ६२ लाख ८३ हजार ८१८ रुपये रेल्वेला अदा करण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. बॉलीवूडकडून चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी फार पूर्वीपासून रेल्वेचा वापर केला जातो. यामध्ये तर अनेक बड्या बॅनरकडून चित्रपटांचे चित्रीकरण मागील काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर झाले आहे. बॉलीवूडबरोबरच सध्या जाहिरात कंपन्यांही स्थानकांवर चित्रीकरण करण्यात आघाडीवर आहेत. मुंबईतील या जीवनवाहिनीवर अनेकांकडून माहितीपटही बनविले जात आहेत. मध्य रेल्वे स्थानकांवर तर गेल्या काही वर्षांत या सर्वांकडून चित्रीकरणासाठी स्थानक आणि परिसर तसेच लोकलचा वापर बराच होत आहे. नवी मुंबईतील स्थानकांचा चित्रीकरणासाठी गेल्या काही वर्षांत वापर केला जात असतानाच आता अन्य स्थानकांवरही बरेच चित्रीकरण होत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे २0१४-१५ मध्ये विविध चित्रीकरणांतून १ कोटी २३ लाख ५ हजार ६६६ रुपयांची कमाई मध्य रेल्वेने केल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. डॉली की डोली, किक, बदलापूर, गुड्डू रंगिला, जिगरिया या चित्रपटांच्या चित्रीकरणाबरोबरच अ‍ॅल्पेनलिबे या गोळीच्या जाहिरातीचे चित्रीकरणही सीएसटी ते लोणावळादरम्यान एका विशेष ट्रेनमध्ये करण्यात आले. तर बीबीसीकडून मुंबई रेल्वेवर आधारित एक माहितीपट तयार केला जात असून सीएसटी, ठाणे, वडाळा, ट्रेन मॅनेजमेन्ट यंत्रणा येथे चित्रीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ६२ कोटी ८३ लाख ८१८ रुपये भाडे बीबीसीला मोजावे लागले. महत्त्वाची बाब खंडाळा-भरपूर स्थानकादरम्यान आयटॉप फिल्म प्रॉडक्शन निर्मित लायन या इंग्रजी चित्रपटाचेही चित्रीकरण करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)